Home »Sports »From The Field» Cricketer Ravindra Jadeja Wedding Album

जडेजाला गिफ्टमध्ये मिळाली होती 1 कोटी रूपयांची AUDI, पाहा Wedding Album

दिव्यमराठी वेब टीम | Apr 19, 2017, 09:34 AM IST

  • 17 एप्रिल रोजी लग्नानंतर झालेल्या वेडिंग रिसेप्शनमध्ये जडेजा आणि रीवाबा. उजवीकडे- लग्नात डान्स करताना जडेजाची बहिण पद्मिनी...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाच्या लग्नाला 1 वर्षे झाले आहे. 2016 मध्ये आयपीएल दरम्यान 17 एप्रिल रोजी त्याचे ग्रॅंड वेडिंग राजकोटमध्ये झाले होते. सध्या त्याची पत्नी रीवाबा प्रेग्नेंट आहे. जडेजा पुढील महिन्यात पिता बनणार आहे. जडेजाच्या लग्नाआधी त्याच्या सास-याकडून 1 कोटी रूपयांची ऑडी कार गिफ्टमध्ये मिळाली होती. तीन दिवस चालले होते ग्रॅंड वेडिंग....
- जडेजा आणि रीवाबाच्या वेडिंगचा प्रोग्रॉम 16 एप्रिलपासून सुरु झाला होता. त्या दिवशी संगीताचा कार्यक्रम ठेवला होता.
- 17 तारखेला लग्न झाले आणि त्याच रात्री जडेजाच्या फॅमिलीने रिसेप्शन दिले होते. दुस-या दिवशी रीवाबाच्या फॅमिलीने रिसेप्शन पार्टी दिली होती. आयपीएल असल्यामुळे कोणीही क्रिकेटर तेथे पोहचला नव्हता. मात्र, जडेजाची टीम गुजरात लायन्सचे काही खेळाडू जरूर पाहुणे म्हणून तेथे पोहचले होते.
इंजिनियर आहे रीवाबा-
लग्नाच्या वेळी रीवाबा यूपीएससीची तयारी करत होती. तिने इंजिनियरिंग केले आहे. रीवाबाची फॅमिली राजकोटमधील कालावड रोड स्थित सरिता विहार सोसायटी राहते.
- रीवाबाचे काका हरिसिंह सोळंकी गुजरात काँग्रेसचे नेते आणि राजकोट शहराचे महामंत्री आहे.
- रीवाबा आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिची आई प्रफुल्लबा राजकोट रेल्वेत काम करते.
पुढे स्लाईड्सद्वारे 13 फोटोजमधून पाहा, रवींद्र जडेजाचा वेडिंग अल्बम...

Next Article

Recommended