आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Ravindra Jadeja’S Fiance Musicla Programm In Rajkot

PHOTOS: जडेजाला लागली हळद, विधीत दिसला रजवाडी साफा-शेरवानीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हळद लावताना रवींद्र जडेजा. - Divya Marathi
हळद लावताना रवींद्र जडेजा.
राजकोट (गुजरात)- क्रिकेटररवींद्र जडेजा आणि रिवाबा सोलंकी यांच्या लग्नाच्या विधीला सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळी जडेजाची वेल (क्षत्रीय राजपूत समाजातील एक परंपरा) निघाली होती, ती इंपीरियल हॉटेलमध्ये पोहोचली. यानंतर जडेजाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. जडेजा आणि रिवाबाचा साखरपूडा 5 फेब्रुवारीला झाला होता. रीवाबा सिव्हिल सर्विसची तयारी करत आहे.
शुक्रवारी रीवाबाला लागली हळद....
शुक्रवारी रात्री हॉटेल इंपीरियल येथे रीवाबाला हळद लागली आणि संगीत सेरेमनीचाही कार्यक्रम पार पडला. रविवारी हे दोघे हॉटेल सीजंसमध्ये लग्नाच्या बेडीत अडकतील.

नोटांचा पऊस आन् जबरदस्त आतिशबाजी...
- सीजंस होटलपासून निघालेली वेली शनिवारी सकाळी 9 वाजता इंपीरियल हॉटलात पोहोचली. येथे रीवाबाच्या वडिलांनी वर पक्षाचे स्वागत केले.
- हॉटेलच्या बाहेरच जबरदस्त डान्स बघायला मिळाला. यावेळी नोटांचाही मोठी उधळन झाली.
- यावेळी जडेजाने रजवाडी साफे आणि गोल्डन वर्क असलेली शेरवानी परिधान केली होती.
- सायंकाळी सीजंस हॉटेलमध्ये आतिशबाजीच्या एका स्पेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजपूत परंपरेने होणार लग्न...
- हा विवाह सोहळा राजपूत पद्धतीनेच पार पडेल असे रिवाबाने सांगितले.
- लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हे कपल जडेजाच्या मुळ गावी म्हणजेच हाडाटोडा येथे जाईल. येथे ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
16 एप्रिलला होणार बॅचलर पार्टी
16 एप्रिलला जडेजाच्या बॅचलर पार्टीचेही आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीसाठी अनेक व्हीआयपींसह दिग्गज क्रिकेटर्सदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यात जडेजाचे जवळचे मित्रही सहभागी होतील. या पार्टीचे आयोजन ‘गुजरात लायंस’ संघाचे मालक केशव बंसल यांनी केले आहे.

पुडील स्लाइड्सवर पाहा, रवींद्र जडेजा आणि रीवाबाच्या राजपूत परंपरेनुसार होणाऱ्या लग्नाच्या विधींचे खास Photos....
- रीवाबाच्या संगीत सेरेमनीचे खास Photos....