स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटर रवींद्र जडेजाचा लग्न समारंभ रविवारी धूमधाडाक्यात पार पडला. राजकोट येथे या सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या बहिणींनीही मनसोक्त आनंद लुटला. वरातीमध्ये तयांनी जबरदस्त डान्स केला. या प्रसंगावर बोलताना जडेजाची मोठी बहिण पद्मिनी म्हणाली, भावाच्या लग्नात आम्ही आईला सर्वाधिक मीस केले.
आणखी काय सांगितले जडेजाच्या बहिणीने...
- ‘रवींद्रच्या लग्नात कसल्याही प्रकारची उनीव राहणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली असून, हा लग्न सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे.‘ असे जडेजाची मोठी बहिणी पद्मिनी हिने सांगितले.
- ती पुढे म्हणाली की, ‘मला आनंद वाटतो की, जडेजाने त्याच्या व्यस्ततेतून वेळ काढला. खरे तर त्याचे लग्न आम्हा सर्वांसाठीच भाऊक क्षण आहे. या प्रसंगी आम्हाला आमच्या आईची सर्वाधिक आठवण येत आहे. जडेजाच्या आईचे निधन 2005 मध्ये झाले आहे.
- जडेजाला पद्मिनी आणि नयना या दोन बहिणी आहेत. नयनाकडे राजकोट येथील जडेजाच्या रेस्तरॉची जबाबदारी आहे.
पुढीस स्लाईड्सवर पाहास, भावाच्या लग्नात दोन्ही बहिणींनी असा केला जबसदस्त डान्स...
- शेवटच्या स्लाइडवर पाहा, जडेजाच्या तलवारबाजीचे प्रात्यक्षिक....