स्पोर्ट डेस्क- भारतीय क्रिकेट संघांच्या व्यस्ततेतून बऱ्याच दिवसांनंतर खेळाडूंना सुटी मिळाली आहे. रोहित शर्मा या सुटीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. सध्या तो पत्नी रितीकासोबत हनिमुनसाठी युरोप टुरवर गेला आहे. हे कपल तेथे मनसोक्त आनंद लुटत आहे.
रोहित आणि रितिका यांचे लग्न गेल्या वर्षी डिसेंबरमध्य झाले. लग्नानंतर हे कपल साधारणपणे सहा महिन्यांनी हनिमुनसाठी परदेशात गेले आहे. रोहितने स्वतः टुरवरील काही फोटो शेअर करून ही माहिती दिली.
एतिहाद एअरवेजचे मानले आभार...
रोहित पत्नी रितिकासह एतिहाद एअरवेजने मुंबईहून टुरसाठी रवाना झाला. त्याने या विमानात काढलेले काही फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. चागल्या सर्व्हिससाठी रोहितने एतिहाद एअरवेजचे आभारही माने आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मिळाला आराम
रोहित शर्माचा शेडुल लग्नानंतर साधारणपणे व्यस्तच होता. तो लग्नापासून सलग क्रिकेट खेळतोय. त्याने जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यानंतर आशियाकप, टी-20 वर्ल्डकप आणि शेवटी आयपीएल. त्यामुळे तो लग्नानंतर कुटुंबाला फार वेळ देऊ शकला नाही. मात्र आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला मिळालेली सुटी तो पत्नी रितिकासह पुरेपूर एन्जॉय करत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहित आणि रितिकाचे युरोप टुरवरील आकर्षक Photos...