आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्माने विकत घेतला 30 कोटीचा फ्लॅट, रितीका सोबत करू शकतो गृहप्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितिका सोबत रोहित. शेजारच्‍या चित्रात रोहितचा फ्लॅट असलेली बिल्डिंग. - Divya Marathi
रितिका सोबत रोहित. शेजारच्‍या चित्रात रोहितचा फ्लॅट असलेली बिल्डिंग.
टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्मा याने 30 कोटी रूपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. वरळी येथील आहूजा टावर्सच्‍या 29 व्‍या मजल्‍यावर त्‍याने 4 BHK फ्लॅट खरेदी केला आहे. याच वर्षी त्‍याने गर्लफ्रेंड रितीकासाेबत साखरपुडाही करून घेतला आहे. दोघेही लवकरच लग्‍नही करणार आहेत. त्‍यानंतर ते नवीन घरात राहायला येऊ शकतात.

आहुजा टावर्स ही बिल्‍डिंग 53 मजल्‍यांची आहे. सिंगापूरच्‍या पामर आणि टर्नर आर्किटेक्‍टने या इमारतीचे डिझाइन केले आहे. सर्व सुविधांनी युक्‍त असलेल्‍या या बिल्डिंगमध्‍ये सलून, स्‍पा सेंटर, योगा रूम, जिम, स्‍विमिंग पूल, मिनी थिएटर, कॅफे, सिगार रूम आदी सुविधा आहेत. रोहितचे कामकाज सांभाळणारा रितीकाचा भाई बंटी सजदेहने सांगितले की, "रोहित खुप दिवसांपासून चांगल्‍या घराच्‍या शोधात होता. आता मुंबईच्‍या चांगल्‍या परिसरात त्‍याने एक फ्लॅट खरेदी केला आहे. येथे राहणे रोहितला सोयीचे होणार आहे. हे घर त्‍याच्‍या मनासारखे आहे.' शिवाय वरळी येथून वानखेडे स्‍टेडियम आणि विमानतळावर जाण्‍यासाठी केवळ 20 मिनीटाचा कालावधी लागतो.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..