आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित-रितिकाचे लग्न आणि रिसेप्शन आज, अंबानींनी दिली होती जंगी पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितिकासह तिचा भाऊ कुणाल डान्स करताना. - Divya Marathi
रितिकासह तिचा भाऊ कुणाल डान्स करताना.
मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा आज गर्लफ्रेंड रितिका सजदेहबरोबर लग्नाच्या बंधनात आडकणार आहे. हा विवाह सोहळा मुंबई येथील बांद्रा वेस्टमध्ये असलेल्या हॉटेल ताज लॅन्ड्समध्ये पार पडणार असून, रात्री8 ते 10.30 वाजेपर्यंत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबानींनी दिली होती जंगी पार्टी
लग्नाआधी अंबानी कुटुंबाने रोहित शर्मा - रितिका सजदेह आणि हरभजनसिंग - गीता बसरा यांना शुक्रवारी जंगी पार्टी दिली होती. या पार्टीला भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, बॉलीवुड स्टार शाहरुख खान यांच्यासह बरेच सेलिब्रिटीज पोहोचले होते.
लग्नानंतर संगीत सेरेमनी
- साधारणपणे संगीत सेरेमनीचा कार्यक्रम लग्नाच्या आधी असतो. मात्र रोहितच्या लग्नात तो कार्यक्रमनंतर होईल.
- लग्न रविवारी, मात्र, संगीत सेरेमनी सोमवारी आहे.
- या कार्यक्रमाचे आयोजन रितिकाचा भाऊ कुणाल याने केले आहे.
- त्याने या कार्यक्रमाच्या स्वतंत्र पत्रिका तयार केल्या आहेत. संगीत सेरेमनीचा कार्यक्रम हॉटेल 'द सेंट रेगिस' येथे होणार आहे.
28 एप्रिलला झाला होता साखर पुडा
रोहितने याच वर्षी आपल्या वाढदिवसाच्या केवळ दोन दिवस आधी म्हणजेच 28 एप्रिलला मुंबईच्या बोरीवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला प्रपोज केले होते. एवढेच नाही तर रोहितने यावेळी तिला अंगठीदेखील घातली होती. रितिका मुंबईत राहते. हे दोघेही एक-दुसऱ्याला साधारणपणे 6 वर्षांपासून ओळखतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहित - रितिकाच्या लग्न समारंभातील फोटोज...
-लग्नाच्या विधींचे काही खास फोटोज...
-पार्टीत सहभागी झालेल्या काही क्रिकेटर्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...