आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन सर्वांसाठी आदर्श, माझ्यासाठी तर तो देवासमान : महेंद्रसिंह धोनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क : महान फलंदाज व क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर माझ्यासाठी खरोखरच देवासमान आहे, असे मत स्‍टार क्रिकेटपटू व भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मांडले. उत्तर अमेरिका बिहार-झारखंड संघाच्या वतीने न्यूजर्सीमध्‍ये आयोजित सत्कार समारंभात त्‍याने सचिनबद्दल सांगितले.
सचिनची खेळावरील निष्ठा, विनम्रता, प्रामाणिकता आणि इतर लोकांसाठी असलेली आत्मियता यांमुळेच तो माझ्यासाठी देवासमान आहे, असे धोनी म्‍हणाला. सचिन सर्वांसाठी आदर्श आहे. त्याला पाहूनच आम्ही मोठे झालो. तो जेव्‍हाही मैदानात उतरत असे, तेव्हा एका क्रिकेटरच्या भूमिकेत नेहमी सुधारणा करताना आम्ही त्याला पाहिले आहे, असेही तो म्हणाला.
सचिनचा सल्‍लाही घेतो
मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडूलकर हा सुरूवातीपासून निष्‍ठावंत क्रिकेटप्रेमी राहिला आहे. त्‍याच्‍या खेळाचा प्रभाव क्रिकेटवर नेहमी टिकून राहील, त्‍याच्‍यापासून इतर खेळाडूंनीही प्रेरणा घेतली आहे. आजही आम्‍ही सचिनचा सल्‍ला घेतो, असे त्‍याने सांगितले.
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून पाहा, धोनीचे सचिनसोबतचे काही क्षण..