स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी प्रकरण रेल्वे प्रवासाचे आहे. दादाचे ज्या बोगीत आरक्षण होते व त्याला जी सीट दिली होती तेथे आधीच कोणीतरी दुसरा प्रवासी बसला होता. सौरवने जेव्हा सीट खाली करण्यास सांगितले तेव्हा त्या व्यक्तीने ती सोडण्यास नकार दिला. त्यावरून दोघांत वाद झाला. अखेर गांगुली वैतागून रेल्वेच्या बाहेर आला. काही वेळानंतर हे प्रकरण मिटले व प्रकरण शांत झाले व रेल्वे रवाना झाली. प्रवाशामुळे उडाला गोंधळ...
- माजी कर्णधार सौरव गांगुली 15 वर्षानंतर ट्रेनमधून प्रवास करत होता.
- तो काही दिवसापूर्वी सिलीगुडीतील बेलूरघाटमधील उभारलेल्या आपल्याच पुतळ्याचे उद्घाटन करायला गेला होता. ज्यामुळे त्याला रेल्वेने प्रवास करावा लागला.
- गांगुली सियालदाह रेल्वे स्टेशन येथून C.A.B. चे संयुक्त सचिव अभिषेक दालमियासोबतच पदातिक एक्सप्रेसमधून प्रवास करत होता.
- रिजर्वेशन लिस्टनुसार, एसी फर्स्ट क्लासमध्ये रिजर्वेशन कोचमध्ये गेल्यावर त्याच्या जागेवर आधीपासूनच कोणीतरी प्रवासी प्रवास करत होता.
पॅसेन्जरने दादाला जागा देण्यास दिला नकार-
- जो पॅसेन्जर सौरवच्या सीटवर बसला होता. त्याला दादाने येथे माझे आरक्षण असल्याचे सांगितले.
- यामुळे तो प्रवासी भडकला आणि दादाशी वाद घालू लागला. तो प्रवासी फक्त आपल्या जागेबाबत दक्ष होता व त्याला त्याची सीट हवी आहे असे सांगत होता.
- यानंतर सौरव ट्रेनमधून खाली आला आणि त्याला पाहून फॅन त्याच्याकडे धावले.
- ही स्थिती पाहून RPF ने धाव घेतली व लोकांना तेथून दूर केले.
- काही वेळानंतर हे प्रकरण टीसीने मिटवले आणि दादाला एसी टू कंपार्टमेंटमध्ये सीट अलॉट करण्यात आली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सौरवसोबत घडलेल्या प्रकरणानंतरचे स्टेशनवरील फोटो...