पठाणकोट - स्टार क्रिकेटर सुरेश रैना त्याच्यापासून नाराज असलेल्या मामा-मामीची समजूत घालण्यासाठी पठाणकोट जवळील सूरजपुर येथे पोहचला. त्याच्यासोबत पत्नी प्रियंका आणि आई-वडिलही होते. घाई गरबडीत मामा-मामीला लग्नाचे निमंत्रण देणे तो विसरला होता. याआधी रैनाच्या आई-वडिलांनी मामा-मामीला सांगितले होते, रैना त्याच्या पत्नीसोबत लग्नानंतर विदेशात जाणार आहे, तो परत आल्यावर त्याला पाठवणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजता तो परिवारासह मामाच्या गावी पोहोचला आहे.
या कारणामुळे मामा नाराज
दिल्लीमध्ये 3 एप्रिलला रैना आणि प्रियंकाचे लग्न मोठ्या थाटात साजरे झाले. मात्र, वर्ल्डकप नंतर तत्काळ रैना त्याच्या लग्नाच्या तयारीत मग्न झाला. मामा- मामीला लग्नाचे निमंत्रण देण्याचे मात्र तो विसरला. म्हणून नाराज झालेल्या मामा-मामीला भेटण्यासाठी त्याला सुटीनंतर त्यांच्या गावी जावे लागले. रैनाचे मामा शशिपाल, खैमराज, मामी तृप्ती, आजी रामेश्वरी यांना रैना त्यांच्या घरी आल्याचा आनंद झाला.
चाहत्यांची घराबाहेर गर्दी
फलंदाज सुरेश रैना गावांत आल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यानेही घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना नाराज न करता, त्यांच्यासोबत सेल्फी घेतला व गप्पाही मारल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, रैनाच्या मामाघरची खास फोटो..