स्पोर्ट्स डेस्क- हॉकीमध्ये भारताने पाकचा पराभव केला. यानंतर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सहेवागने ट्विटरवर पाक क्रिकेटर शोएब अख्तरसाठी एक फनी कमेंट केली. सहेवागच्या या कमेंटवर शोएबनेही मोठ्या शांतपणे उत्तर दिले. यानंतर ट्विटरवर या दोघांच्या मैत्रीची तुलना जय-वीरूशी केली जात आहे.
सेहवागची कमेंट आणि शोएबचे उत्तर....
- भारत विजयी होताच सहेवागने ट्वीट केले, ‘सॉरी शोएब भाई, हॉकीचाही 'मौका' हातातून निघून गेला.’
- मंगळवारी सुल्तान अजलान शाह कप हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 5-1 धूळ चारली.
- यानंतर शोएबने उत्तर दिले, ‘माझा भाऊ वीरू काहीही म्हणाला तरी मी त्याला क्षमा करील. कारण त्याचे मन सोन्याचे आहे.‘
- शोएबने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'तो कुणाच्याही बाबतीत वाईट विचार करत नाही. तो गमतीजमती नक्कीच करतो त्याचे उत्तर मी तसेच देइल.’
फॅन्स म्हणाले जय-वीरूची जोडी....
- सहेवागच्या कमेंट नंतर शोएबने दिलेल्या या उत्तरामुळे चाहत्यांनी त्यांची जबरदस्त तारीफ केली आहे.
- चाहत्यांनी या दोघांनाही शोले सिनेमातील जय-वीरूची जोडी म्हणून संबोधले आहे.
भारताकडे ब्रॉन्झ जिंकण्याची संधी
- हॉकीमधील या विजयाबरोबरच भारताने स्पर्धेच्या गुण तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
- मंगलवारी झालेल्या या सामन्यात भारताने अप्रतिम खेळ करत पहिल्या हाफमध्ये 2-1 ने आघाडी घेतली होती.
- दुसऱ्या हाफमध्ये आणखी 3 गोल केले. यामुळे भारताला ब्रॉन्झ जिकण्याची संधी निर्मान झाली आहे.
- वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ 3 सामन्यात 9 प्वाइंट्स करत टॉपवर आहे. तर सध्या चॅम्पिअन असलेल्या न्यूझिलंड संघाने चार सामने खेळत 8 पॉइंड्स केले आहे..
पुढीस स्लाइड्सवरपाहा, सहेवाग, शोएबचे ट्वीट्स.... आणि चाहत्यांच्या कमेंट्स....