आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Yuvraj Singh Shares Dance Video On Twitter

Video: सानियाच्‍या पतीला युवराजचे जोरदार उत्‍तर, डान्स करतानाचा व्‍हिडीओ केला शेयर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्‍या आव्‍हानाला भारतीय क्रिकेटर युवराज सिंहने चांगलेच उत्‍तर दिले आहे. युवराजने डान्स करतानाचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. शोएब मलिकने युवराजला डान्स करण्‍याचे आवाहन ट्विटरवर केले होते.
युवराजने ट्विटरवर 10 सेकंदाचा एक व्‍हिडीओ अपलोड केला आहे. त्‍याने लिहीले की, 'शोएब मलिक.. भाई आम्‍हीही नेहमी मैदानात असतो.' या डान्‍सच्‍या व्‍हिडीओमध्‍ये युवराज मून वॉक करताना दिसत आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान टीमने श्रीलंकेला पराभूत करून विजयाचा जल्‍लोष साजरा केला. भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झानेही पती शोएब मलिक आणि पाकिस्‍तानी क्रिकेट टीमच्‍या खेळाडूंसोबत डान्स केला होता. या डान्सचा व्‍हिडीओ ट्विटरवर अपलोड करण्‍यात आला होता. युवराजनेही हा व्‍हिडीओ पाहिला. त्‍यानंतर त्‍याने गमतीने ट्विट केले होते की, ‘शोएब मलिक आणि सानिया जबरदस्त खेळाडू आहे. मात्र, त्‍यांचा हा डान्‍स हास्‍यास्‍पद आहे.’त्‍यावर शोएबने उत्‍तर देत युवीला आव्‍हान दिले की, युवीने येऊन आमच्‍यासोबत डान्‍स करावा, तेव्‍हा कळेल कोणाचा डान्‍स हास्‍यास्‍पद आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, युवीच्‍या डान्‍सचे फोटो आणि ट्विट्स..