आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाकडून खेळण्यापेक्षा लीग खेळणे फायदेशीर, क्रिकेटपटूंमधील वाढता मतप्रवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडीजचा क्रिस गेल गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय संघापेक्षा विविध टी-२० लीग स्पर्धेतच अधिक खेळल्याचे दिसले. - Divya Marathi
वेस्ट इंडीजचा क्रिस गेल गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय संघापेक्षा विविध टी-२० लीग स्पर्धेतच अधिक खेळल्याचे दिसले.
मुंबई - कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटच्या आधाराने वाढू लागलेले ट्वेंटी-२० क्रिकेटचे रोपटे आता मूळ घट्ट धरू लागले आहे. मात्र, हेच क्रिकेट मुख्य क्रिकेटला खाऊन टाकेल, असा धोका स्पष्ट दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू संघटनेने तशी धोक्याची घंटा वाजवली असून भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वगळता अन्य देशांच्या क्रिकेटपटूंनी आपापल्या देशाचे करार करण्यापेक्षा मुक्त राहून जगभरातल्या ट्वेंटी-२० क्रिकेट लीगमध्ये सहभागी होऊन पैसा कमावण्याचा मार्ग पत्करला आहे.

खेळाडू संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्षाकाठी १० कसोटी, १५ एकदिवसीय व ५ ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठीच्या वर्षाच्या करारासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सुमारे ७.९ लाख डॉलर, इंग्लंडच्या खेळाडूंना साडेआठ लाख डॉलर, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना साडेतीन लाख डॉलर, श्रीलंकेच्या व न्यूझीलंडच्या खेळाडूंना सव्वादोन लाख डॉलर, वेस्ट इंडियन खेळाडूंनाही सव्वादोन लाख डॉलर, तर बांगलादेशी खेळाडूंना ६७ हजार डॉलर एवढे वार्षिक मानधन मिळते. त्याच्या बदल्यात त्यांना वर्षभरात आपापल्या देशासाठीच खेळावे लागते. त्यांच्या देशातील लीग क्रिकेट एकदाच खेळता येते किंवा काहींना ती संधीही मिळत नाही.

त्याऐवजी सध्या जगभरात सात देशांत आयपीएलसारख्या ट्वेंटी-२० क्रिकेट लीग सुरू आहेत, त्यापैकी २ ते ३० लीगमध्ये खेळल्यास सर्वसाधारणपणे यापेक्षा किती तरी पटींनी अधिक मानधन खेळाडूंना मिळते. त्याशिवाय खेळासाठी लागणारा कालावधीही कसोटी मालिका किंवा एकदिवसीय मालिकांपेक्षा कमी असतो.

त्यातही, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या विंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या क्रिकेट बोर्डांनी मान्य केलेली मानधनाची रक्कमदेखील खेळाडूंना मिळत नाही. वेस्ट इंडीजचा क्रिस गेल, केरोन पोलार्ड हे खेळाडू वर्षभर विविध देशांतील टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळण्यात व्यग्र असतात.
करारमुक्त खेळाडू
> कसोटी मालिकेचे निकाल, रँकिंग, एकदिवसीय क्रिकेटचा चार वर्षांनी होणारा वर्ल्डकप यांना आर्थिकदृष्ट्या फारसे महत्त्व राहिले नाही, त्याऐवजी जाहिरातदार आणि खेळाडूंच्या दृष्टीने ट्वेंटी-२० क्रिकेट लीग सोन्याची अंडी देणारी कोंबडी
ठरली आहे.
> त्यामुळे जगातील क्रिकेटपटूंपैकी ४९ टक्के खेळाडूंनी आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डाशी करार करण्यापेक्षा मुक्त राहून, विविध देशांतील लीगमध्ये खेळणे पसंत केले आहे. आयसीसीच्या क्रिकेटच्या मक्तेदारीलाच त्यामुळे धोका लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...