आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Like Bishen Singh Bedi Many Non Australian Cricketers Married Australian Girls

बेदी, अकरमसह या सहा क्रिकेटपटूंनी केले ऑस्ट्रेलियन मुलींशी लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी भारतीय क्रिकेटर बिशन सिंह बेदी (डावीकडे), माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम (उजवीकडे वर), न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस क्रॅन्स (उजवीकडे खाली) - Divya Marathi
माजी भारतीय क्रिकेटर बिशन सिंह बेदी (डावीकडे), माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम (उजवीकडे वर), न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस क्रॅन्स (उजवीकडे खाली)
भारताचे माजी स्टार फिरकीपटू बिशन सिंह बेदी क्रिकेटसह त्‍यांच्‍या पर्सनल लाईफमुळेही चाहत्‍यांमध्‍ये चर्चेत होते. आज 69 वा जन्‍मदिवस (25 सप्‍टेंबर , 1946) ते साजरा करत आहेत. माजी कसोटी कर्णधार बेदी यांनी दोन लग्‍न केले आहेत. त्‍यांची पहिली पत्नी ऑस्ट्रेलियन होती, तर दुसरी भारतीय. पहिल्‍या पत्‍नीपासून त्‍यांनी घटस्‍फोट घेतला आहे.
1967-68 दरम्‍यान भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेली होती. तेव्‍हा मेलबर्न मध्‍ये झालेल्‍या एका पार्टीत बिशन सिंह बेदी यांची ऑस्ट्रेलियन गर्ल ग्लेनिथ सोबत भेट झाली. पुढे त्‍यांच्‍यात प्रेमसंबंध जुळून आले. लवकरच या जोडीचे लग्‍नही झाले. काही वर्षानंतर बेदी- ग्‍लेनिथ यांना मुलगा झाला. त्‍याचे नाव गावस इंदर सिंह ठेवण्‍यात आले. यातील ‘गावस’ हा शब्द दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांच्‍या नावातून घेण्‍यात आला.
ग्लेनिथ सोबत घटस्‍फोट
काही वर्षानंतर बिशन सिंह बेदी आणि ग्लेनिथ यांच्‍यात घटस्‍फोट झाला. दोघांना एक मुलगा (गावस इंदर सिंह) आणि एक मुलगी (ग्लिंडर) आहे. त्‍यानंतर बेदी यांनी दुसरे लग्‍न केले. त्‍यांचा दुस-या पत्‍नीपासूनचा मुलगा अंगद आहे. अंगद मॉडल आणि अभिनेता आहे. दूस-या लग्‍नानंतर बेदी यांना नेहा नावाची एक मुलगीही आहे.

गावसकरांमुळे संबंध बिघडले
बेदींवर सुनील गावसकर यांचा मोठा प्रभाव होता. त्‍यांनी मुलाचे नावही गावसकर यांच्‍या आडनावावरून ठेवले होते. गावसकर यांनी वेस्ट इंडिज विरोधात डेब्यू कसोटी मालिकेत 774 धावा केल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍या या कामगिरीमुळे बेदी प्रभावित झाले होते. मात्र पुढे त्‍यांच्‍यातील संबंध बिघडले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, क्रिकेट जगतातील असे खेळाडू ज्‍यांनी केले ऑस्ट्रेलियन मुलींशी लग्‍न..