स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडाचा महिला क्रिकेट संघ वुमन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये भाग घेण्यासाठी भारतात आला आहे.या संघासोबतच डॅनियल व्याटदेखील येथे आली आहे. डॅनियल दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा चर्चेत आली होती. या मागचे कारण म्हणजे तिने तेव्हा विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते. तेव्हापासून भारतीय चाहते तिला ओळखतात.
विराटला भेटणार...
- सध्या डॅनियल चैन्नईमध्ये आहे. येथे पोहोचल्यानंतर तिने तिचे बरेचसे फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.
- या फोटोंमध्ये तिने भारताची फार प्रशंसा केली आहे.
- डॅनियल इंग्लंड महिला क्रिकेट टीममध्ये ऑलराउंडर आहे.
- डेनियलने आता पर्यंत 62 टी-20 सामन्यात 12.35 च्या सरासरीने 420 धावा केल्या आहेत.
- तर बॉलिंग करताना 62 सामन्यात तिने 46 विकेट घेतल्या आहेत. तिचा बेस्ट परफॉर्मंस 4/11 असा आहे.
- वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा संघ आपला पहिला सामना 17 मार्चला बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे.
- भारतात असेपर्यंत डॅनियल फेव्हरिट क्रिकेटर विराटलाही भेटू शकते.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, डेनियलने ट्विटर शेअर केलेले खास फोटोज...
- पाहा, विरोटसोबतचे तिचे खास फोटो...