आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान-श्रीलंकेच्या सामन्यादरम्यान मैदानावर भिरकावला दगड, सामना रोखला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दगडफेक झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू पॅव्हेलियनकडे जाताना. - Divya Marathi
दगडफेक झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू पॅव्हेलियनकडे जाताना.
कोलंबो - येथील प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या एक दिवसीय सामन्या दरम्यान श्रीलंकेच्या चाहत्याकडून मैदानात दगड भिरकावण्याच्या प्रकारानंतर खेळ थांबवण्यात आला. दोन्ही देशांदरम्यान पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. रविवारी रात्री तिसरा सामना सुरु असताना अर्ध्या तासासाठी खेळ थांबवण्यात आला.
दुसऱ्या डावात झाली दगडफेक
सामन्याच्या दुसऱ्या डावातील 34 व्या ओव्हर दरम्यान दगडफेकीची घटना घडली. तेव्हा श्रीलंकेने सात विकेट गमावत 158 रन्स केले होते. त्यांचा पराभव जवळजवळ निश्चित होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूनंतर पाकिस्तानी फिल्डरच्या जवळ एक दगड येऊन पडला. त्याने अंपायरकडे याची तक्रार केली. अंपायरने तत्काळ कारवाई करत खेळ थांबवला आणि सर्व खेळाडूंना ड्रेसिंगरुम मध्ये जाण्यास सांगितले.
गाड्यांवरही दगडफेक
एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले, की स्टेडियमच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान करण्यात आले. त्यानंतर स्टेडियमच्या बाहेर आणि आत दोन्ही बाजूने मोठा बंदोबस्त उभा करण्यात आला आणि समाना पुन्हा सुरु झाला.
पाकिस्तानने जिंकला सामना
दगडफेकीच्या घटनेनंतर अर्ध्या तासाने पुन्हा सामना सुरु झाला आणि पाकिस्तानाने 135 रन्सने श्रीलंकेवर विजय मिळविला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने निर्धारित 50 ओव्हरमध्ये चार विकेट गमावत 316 रन्स केले होते. सरफराज अहमदने 77 आणि मोहम्मद हफीजने 54 रन्स केले होते. त्याच्या उत्तरात लंकेने 41.1 ओव्हरमध्ये 181 रन्स केले. पाकिस्तानच्या याशीर शाहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दगडफेकीनंतरचे स्टेडियममधील दृष्य
बातम्या आणखी आहेत...