आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalmiya Made BCCI Richest Cricket Board In World

दालमियांनीच BCCI ला बनवले श्रीमंत, पाहा जगातील क्रिकेट बोर्डांची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ICC चे माजी आणि BCCI चे विद्यमान अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यामुळे क्रिकेट विश्वाला एक मोठा धक्का बसला आहे. 75 वर्षांचे दालमिया अनेक दिवसांपासून आजारी होते. कोलकात्याच्या के. बी. एम. बिर्ला हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादिवसापासूनच ते ICU मध्ये होते.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड
BCCI ला जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली क्रिकेट बोर्ड बनवण्यामध्ये जगमोहन दालमिया यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार बोर्डाची एकूण संपत्ती 1891 कोटी रुपये आहे. बोर्ड एंडोर्समेंट, मालिकांचे आयोजन यातून हे उत्पन्न मिळवते.

दालमियांचा प्रवास, 1997 मध्ये बनले होते ICC चे अध्यक्ष
दालमिया हे 1997 मध्ये आशियातून निवडले गेलेले पहिले ICC अध्यक्ष होते. मार्च महिन्यात त्यांनी 10 वर्षांनंतर पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवले होते. 2000 साली ICC च्या पदावरून हटल्यानंतर 2001 मध्ये ते प्रथमच बीसीसीआयचे अध्यक्ष निवडले गेले होते. 2004 मध्ये झालेल्या BCCI च्या वादग्रस्त निवडणुकीत दालमियांचे नीटकवर्तीय असलेले रणबीर सिंह महेंद्र अध्यक्ष निवडले गेले. 2005 मध्ये शरद पवार या पदावर आल्यानंतर दालमियांना त्यांच्या विरोधकांच्या डावपेचांचा सामनाही करावा लागला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या क्रिकेट विश्वातील 10 सर्वात श्रीमंत बोर्ड आणि त्यांची संपत्ती, अध्यक्ष आणि कर्णधारांबाबत...