आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : गुजरात लायन्ससमाेर दिल्लीचे तगडे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी गुजरात लायन्स संघापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असेल. गत सामन्यात गुजरात लायन्सला पंजाबकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. सत्रात गुजरातचा हा घरच्या मैदानावरील अखेरचा सामना असेल. यामुळे ही लढत जिंकून घरच्या मैदानावर विजयी समारोप करण्याचा प्रयत्न गुजरातचा असेल. गुजरातला उर्वरित सामने इतर मैदानांवर खेळायचे आहेत.

सलग तीन विजय मिळवल्यानंतर गुजरातला किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी २३ धावांनी पराभूत केले. विजयी ट्रॅकवर असलेल्या गुजरातच्या अागेकूचला ब्रेक लागला. गुणतालिकेत गुजरात लायन्सची स्थिती भक्कम असून एखाददुसऱ्या पराभवाने त्यांना फारसा फरक पडेल असे वाटत नाही. गुजरातच्या नावे ८ सामन्यांत ६ विजयासंह १२ गुण आहेत. मात्र, घरच्या प्रेक्षकांसमोर विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरेश रैनाची टीम करेल.

गुजरातची टीम फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत मजबूत आहे. मात्र, खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी होणे हे प्रत्येक सामन्यात महत्त्वाचे असते. लगेच विजयी ट्रॅकवर परतण्याचे आव्हान गुजरातपुढे असेल. गुजरातसमोर जहीर खानच्या दिल्लीचे आव्हान असेल. दिल्लीची टीम मजबूत असून गुजरातला चकित करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.
दोन्ही संघ असे
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन स्मिथ, अॅरोन फिंच, ब्रेंडन मॅक्लुम, ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर, ईशन किशन, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, प्रवीणकुमार, प्रवीण तांबे, डेल स्टेन, प्रदीप सांगवान, शादाब जकाती, दिनेश कार्तिक.

दिल्ली डेअरडेव्हिल्स :
जहीर खान (कर्णधार), क्विंटन डिकॉक, श्रेयस अय्यर, जे.पी.डुमिनी, मयंक अग्रवाल, सॅम बिलिंग, अमित मिश्रा, मो. शमी, क्रिस मोरिस, पवन नेगी, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, इम्रान ताहिर, करुण नायर, खलील अहमद.
बातम्या आणखी आहेत...