आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकहॅमपुढे पत्नी व्हिक्टोरियाही हरली, शरिरावरील टॅटूंची संख्या 44 वर गेली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - टॅटू गोंदवण्याची चर्चा असेल आणि डेव्हिड बेकहॅमचे नाव येणार नाही, हे अशक्य आहे. इंग्लंडच्या एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बेकहॅमने आतापर्यंत ४४ टॅटू शरीरावर गोंदवले आहेत. यामुळे त्याचे शरीर जवळपास पूर्ण झाकले आहे, मात्र बेकहॅम काही थांबण्याच्या तयारीत नाही. नुकतेच "अद्याप माझी टॅटू गोंदवण्याची हौस पूर्ण झालेली नाही. माझी पत्नी व्हिक्टोरियानेसुद्धा माझ्या टॅटूसमोर हार मानली आहे. आता ती मला यासाठी विरोध करत नाही,' असे एका मुलाखतीत त्याने मान्य केले. त्याची पत्नी व्हिक्टोरिया टॅटूबाबत त्याला नेहमी प्रश्न विचारायची की, "तू असे का करतो?' ....अखेर ४० वर्षीय बेकहॅमने याबाबत खुलासा केला. "टॅटू माझ्या भावना मोकळ्या करण्याचा मार्ग आहे, ज्यांची मला काळजी वाटते किंवा ज्यावर मी प्रेम करतो त्यांच्याप्रति.' आपल्या स्टाइलसाठी बेकहॅम प्रसिद्ध आहे. तो नेहमी "स्मार्ट' दिसण्याचा प्रयत्न करतो. बालपणापासून त्याला चांगले ड्रेस आणि बूट घालण्याचा छंद होता. "माझे वडील मला शानदार सूट घेऊन द्यायचे. ते खूप महागडे नसत. मी स्वत:ला नशीबवान समजतो की, मी काही कार खरेदी करण्यात यशस्वी ठरलो. मी जे काही पैसे कमावले ते चांगल्या ठिकाणी खर्च केले,' असे बेकहॅम म्हणाला.

त्याची पाच वर्षांची मुलगी हार्परने तर स्वत: त्याच्या शरीरावर बाहुलीसारखे चित्र कोरले आहे. त्याने आपल्या मुलांच्या टोपणनावाचे टॅटू मानेच्या जवळ गोंदवले. त्याचे लग्न १९९९ मध्ये झाले आणि मुलगासुद्धा ९९ मध्ये झाला. यामुळे त्याने ९९ क्रमांकाचा टॅटूही गोंदवला. त्याने ७ आणि २३ क्रमांकही गोंदवले. हे दोन्ही त्याच्या जर्सीचे नंबर होते. बेकहॅम जगातला सर्वाधिक सेक्सी जीवित पुरुष आहे. त्याला हा किताब पीपल मॅग्झिनने आपल्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त २०१५ मध्ये दिला होता. मिलानकडून अखेरीस २००९ मध्ये खेळलेल्या बेकहॅमने फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे. इंग्लंड फुटबॉल संघाकडून बेकहॅमने मैदान गाजवले होते.

टॅटूवर खर्च केले ५२ लाख रुपये
एका ब्रिटिश वर्तमानपत्राने दावा केला की, बेकहॅमने गेल्या काही वर्षांत टॅटूवर ५४००० पाउंड (जवळपास ५२ लाख रु.) खर्च केले आहेत. बेकहॅमने आपले बहुतेक टॅटू आपले कुटुंब आणि मुलांना समर्पित केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...