आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिलर ठरला किलर : रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बन - डेव्हिड मिलरच्या तुफानी शतकाच्या बळावर द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मोठ्या स्कोअरच्या सामन्यात हरवले. डर्बन येथे झालेल्या सामन्यात द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विकेटने हरवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. द. आफ्रिकाने “मॅन ऑफ मॅच’ डेव्हिड मिलरच्या नाबाद ११८ धावांच्या खेळीच्या बळावर ३७२ धावांचे लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणाऱ्या संघाचा हा दुसरा मोठा स्कोअर ठरला आहे. याआधी द. आफ्रिकेनेच २००६ मध्ये ४३४ धावांचे लक्ष्य गाठले होते. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत बाद ३७१ धावा काढल्या. आफ्रिकेने ४९.२ षटकांत बाद ३७२ धावा काढून हे लक्ष्य खुजे ठरवले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१०८) आणि डेव्हिड वॉर्नर (११७) यांची शतके व्यर्थ ठरली.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. डेव्हिड वॉर्नरने अॅरोन फिंचसोबत ११० धावांची शतकी भागीदारी केली. फिंचने ३४ चेंडूंत षटकार, चौकारांसह ५३ धावा काढल्या. त्याला ताहिरने बाद केले. यानंतर वॉर्नरने कर्णधार स्मिथसोबत १२४ धावांची शतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आपापले शतक पूर्ण केले. वॉर्नरने ११७, तर स्मिथने १०८ धावा काढल्या. जॉर्ज बेलीने २८ धावांची खेळी केली. सहाव्या विकेटसाठी ट्रेव्हिस हेडने मॅथ्यू वेडसोबत ४६ धावा जोडल्या. या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने बाद ३७१ धावांचा डोंगर उभा केला. किंग्जमीडमध्ये हा कोणत्याही संघाने काढलेला सर्वोच्च स्कोअर ठरला. हेडने ३५, तर वेडने १७ धावा काढल्या.

मिलरने संकटातून बाहेर काढले
धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची टीम बाद २१७ अशी संकटात सापडली होती. द. आफ्रिकेने सहावी विकेट गमावली त्यावेळी त्यांचा स्कोअर २६५ असा झाला होता. तेव्हा आफ्रिकेला ७४ चेंडूंत १०७ धावांची गरज होती. मात्र, डेव्हिड मिलरने एकट्याच्या बळावर सामना ऑस्ट्रेलियाच्या हातून िहसकावला. मिलरने ७९ चेंडूंत ११८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि उत्तुंग षटकार मारले.
बातम्या आणखी आहेत...