आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AUS v PAK: लंचपूर्वीच वॉर्नरने ठोकले शतक, 40 वर्षानंतर कसोटीत घडला अनोखा विक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सर्वात वेगाने शतक ठोकणारा बॅट्समन बनला वॉर्नर. त्याने आपलेच रिकॉर्ड (82 बॉलमध्ये शतक) मोडले. - Divya Marathi
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सर्वात वेगाने शतक ठोकणारा बॅट्समन बनला वॉर्नर. त्याने आपलेच रिकॉर्ड (82 बॉलमध्ये शतक) मोडले.
सिडनी- डेव्हिड वॉर्नरचे विक्रमी शतक (११३) आणि मॅट रेनशॉच्या (नाबाद १६७) शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद ३६५ धावा ठोकल्या. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सामन्याच्या पहिल्याच दिवशी जेवणाच्या ब्रेकच्या आधी शतक ठोकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर अशी कामगिरी करणारा वॉर्नर एकमेव फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने ७८ चेंडूंचा सामना करताना १७ चौकारांच्या साह्याने १०० धावा काढल्या. वॉर्नर ९५ चेंडूंत ११३ धावा काढून बाद झाला. कसोटी क्रिकेट करिअरमध्ये वॉर्नरचे हे १८ वे शतक ठरले.
  
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून जबरदस्त सुरुवात केली. मेलबर्न कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने दमदार खेळ केला. वॉर्नर-रेनशॉ जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांना त्रस्त करताना पहिल्या विकेटसाठी ३२.३ षटकांत १५१ धावांची दीडशतकी सलामी दिली. यात एकट्या वॉर्नरने ११३ धावांचे योगदान दिले. दोन्ही सलामीवीरांनी शतके ठोकली. वॉर्नरने आपल्या घरच्या मैदानावर ११८ मिनिटांत ७८ चेंडूंचा सामना करताना शतक ठोकले. वहाब रियाजने सरफराज अहेमदकरवी वॉर्नरला बाद केले.  

हँड्सकोंब-रेनशॉची शतकी भागीदारी : चौथ्या विकेटसाठी रेनशॉ-हँड्सकोंब यांनी १२१ धावांची शतकी भागीदारी केली. हँड्सकोंबने ८२ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४० धावा काढल्या. त्याने दुसऱ्या टोकाने फलंदाजी करणाऱ्या रेनशॉला चांगली साथ दिली. 
  
डेव्हिड वॉर्नरची कमाल   
- डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर कसोटीच्या पहिल्या दिवशी जेवणाच्या ब्रेकच्या आधीच्या आधी शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.    
- कसोटीत जेवणाच्या ब्रेकच्या आधी शतक ठोकणारा वॉर्नर एकूण जगातला पाचवा फलंदाज ठरला. वॉर्नरच्या आधी अशी कामगिरी व्हिक्टर ट्रम्पर, चार्ल्स मॅककार्टनी, डॉन ब्रॅडमन (तिघे ऑस्ट्रेलिया) तसेच पाकिस्तानच्या माजिद खानने केली आहे. मात्र, वॉर्नरने ही कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर केली. इतरांनी ऑस्ट्रेलियाबाहेर केली.  
- सिडनीच्या मैदानावर वेगवान शतकाचा आपलाच विक्रम वॉर्नरने मोडला. त्याने या वेळी ७८ चेंडूंत शतक ठोकले. याआधी त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध येथेच ८२ चेंडूंत शतक ठोकले होते.   

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव : ८८ षटकांत ३ बाद ३६५ धावा. (डेव्हिड वॉर्नर ११३, एम. रेनशॉ नाबाद १६७ धावा. २/६३ वहाब रियाज)
 
 
सिडनी कसोटीवर एक नजर-
- ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनेत मंगळवारी सुरु झाला.
- पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून 365 धावा जोडल्या आहेत.
- वॉर्नरशिवाय ओपनर मॅट रेनशॉ यानेही शानदार शतक ठोकले. तो दिवसअखेर 167 धावांवर नाबाद होता. 
- पहिल्या दोन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, कसोटी क्रिकेटमधील विक्रमांबाबत रोचक माहिती....
बातम्या आणखी आहेत...