आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी चेंडूचे १३ बळी, डे-नाइट कसोटी सामन्‍याचा दुसरा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - भारतात नागपूर कसोटी अडीच दिवसांत संपल्यामुळे खेळपट्टीवर जगभर टीका होत आहे. मात्र, तिकडे ऑस्ट्रेलियात अॅडिलेड येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक डे-नाइट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी १३ विकेट पडल्या. यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २२४ धावांत आटोपला. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून ११६ धावा काढल्या होत्या. सामन्याचा निकाल रविवारी अर्थात लढतीच्या तिसऱ्याच दिवशी लागण्याची दाट शक्यता आहे. या सामन्यात प्रथमच गुलाबी चेंडूचा उपयोग होत आहे.
न्यूझीलंडला पहिल्या डावात २०२ धावांत गुंडाळल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाला पाहुण्यांविरुद्ध अवघ्या २२ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने अवघ्या ११६ धावांत ५ विकेट गमावल्या असून त्यांच्याकडे केवळ ९४ धावांची आघाडी आहे.

जोस हेझलवूडने ३२ धावांत ३ विकेट, तर मिशेल मार्शने ४४ धावांत २ गडी बाद केले. या दोघांच्या गोलंदाजीने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात संकटात आणले. मार्टिन गुप्तिल (१७), टॉम लँथम (१०) आणि रॉस टेलर (३२) या तिघांना हेझलवूडने तंबूत पाठवले, तर केन विल्यम्सन (९) आणि कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम (२०) यांना मिशेल मार्शने बाद केले.
नेव्हिल-लॉयनने डाव सावरला
सकाळी ऑस्ट्रेलियानेसुद्धा ११६ धावांत आपल्या ८ विकेट गमावल्या होत्या. मात्र, यष्टिरक्षक पीटर नेव्हिल (६६) आणि नॅथन लॉयन (३४) यांनी उपयोगी खेळी करून आपल्या टीमला पहिल्या डावात २२ धावांची आघाडी मिळवून दिली.