आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डे-नाइट कसाेटी- न्यूझीलंडच्या दिग्गजांचा गुलाबी चेंडूने ‘बेरंग’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - क्रिकेटच्या विश्वात एेतिहासिक ठरलेल्या गुलाबी चेंडूवरच्या डे-नाइट कसाेटीच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी न्यूझीलंड संघातील स्टार खेळाडूंचा रंग उडाला. अाॅस्ट्रेलियन गाेलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे किवींना २०२ धावांत पहिला डाव गुंडाळावा लागला. अाॅस्ट्रेलियाचा दिवगंत खेळाडू फिलीप ह्यूजच्या पहिल्या पुण्यतिथीदिनी सुरू झालेल्या या कसाेटीला पाहण्यासाठी ४४ हजार चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली.
अाॅस्ट्रेलियाकडून वेगवान गाेलंदाज मिशेल स्टार्क अाणि जाेश हेझलवुडने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पीटर सिडल व लियाेनने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियन टीमने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात दाेन गड्यांच्या माेबदल्यात ५४ धावांची खेळी केली. कर्णधार स्मिथ (२४) अाणि वाेग्स (९) हे दाेघेही मैदानावर खेळत अाहेत.