आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Declaration Of Two New Teams For IPL Season 9 And 10 On The Place Of CSK And RR

IPL: पुणे, राजकोट दोन नवीन संघ, 9 एप्रिल ते 29 मेदरम्यान रंगणार सामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) सीझन 9 व 10 मध्ये राजकोट आणि पुणे हे दोन संघ खेळताना दिसतील. इंटेक्स ग्रुपने राजकोट संघ 10 कोटी रुपयांमध्ये तर पुणे संघ आरपी-संजीव गोयंका ग्रुपने 16 कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. संजीव गोयंकाची कंपनी न्यू रायझिंगकडे पुणे संघाचा मालकी हक्क असेल.

दोन नवीन संघांची आवश्यकता का?
- सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेली जस्टिस लोढा कमिटीने सट्टेबाजी प्रकरणी चेन्नई आणि राजस्थान संघावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.
- ऑक्टोबरमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या मिटिंगमध्ये दोन्ही संघांवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती.
- यांच्या जागी दोन नवीन संघांना 2016 आणि 2017 च्या आयपीएलमध्ये जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी बीसीसीआयने टेन्डरही काढे होते.
या कंपन्याही होत्या शर्यतीत
21 कंपन्यांनी दोन नवीन संघांसाठी टेंडर फरले होते. या पैकी 11 कंपन्यांची नावे समोर आली होती.

- स्टार इंडिया
- व्होडाफोन
- व्हिडिओकॉन
- RPG ग्रुप (हर्ष गोयंका)
- आरपी-संजीव गोयनका ग्रुप
- एनडीटीव्ही
- सेट मॅक्स
- सायकल अगरबत्ती
- आयएल अँड एफएस
- वाधवा ग्रुप
- चेट्टीनाड सीमेंट्स
खेळाडूंच्या बाबतीत रहस्य कायम
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर बंदीनंतर, आता या संघांकडून खेळणाऱ्या खेळाडूंचे भविष्य काय असणार आहे? हे खेळाडूही दोन वर्षांपर्यंत आयपीएलच्या बाहेर राहणार? की धोनी-रैना-रहाणेसारख्या स्टार क्रिकेटर्सचा पुन्हा लिलाव होणार?
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय होता लोढा कमिटीचा निर्णय...
- कसे उघडकीस आले प्रकरण ...
- कोणते नामी चेहरे अडकले आहेत यात...
बातम्या आणखी आहेत...