आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-10: पाेलार्ड, सिमन्सचा झंझावात; मुंबईकडून दिल्लीचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - केराेन पाेलार्ड (नाबाद ६३) अाणि सामनावीर सिमन्स (६६) यांच्या झंझावातानंतर हरभजन सिंगने (३/२२) केलेल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने अायपीएलमध्ये शनिवारी नववा विजय संपादन केला. याशिवाय मुंबईने अापली विजयी माेहीम कायम ठेवली. दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने अापल्या ११ व्या सामन्यात जहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला धूळ चारली. मुंबईने १४६ धावांनी सामना जिंकला. दिल्लीला सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर यजमान दिल्लीचे अाघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. 

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात दिल्लीसमाेर विजयासाठी खडतर २१३ धावांचे अाव्हान ठेेवले हाेते. प्रत्युत्तरात दिल्ली टीमने घरच्या मैदानावर अवघ्या ६६ धावांत गाशा गुंडाळला.  करुण नायरने सर्वाधिक २१ धावांची खेळी केली.  
सिमन्सची अातषबाजी : मुंबईच्या सलामीवीर लिंडल सिमन्स अाणि पार्थिव पटेलने दमदार सुरुवात केली. त्यांनी टीमला ७९ धावांच्या भागीदारीची शानदार सलामी दिली. मात्र, अमित मिश्राने ही जाेडी फाेडली. त्याने पार्थिव पटेलला (२५) झेलबाद केले. दरम्यान सिमन्सने ४३ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे ६६ धावांची खेळी केली. 
पाेलार्ड-हार्दिकची अभेद्य भागीदारी :  फाॅर्मात अालेल्या पाेलार्डने युवा फलंदाज हार्दिक पंड्यासाेबत चाैथ्या विकेटसाटी अभेद्य ५९ धावांची भागीदारी रचली.  पाेलार्डने ३५ चेंडूंत ५ चाैकार अाणि ४ षटकारांसह नाबाद ६३ धावांची खेळी केली. हार्दिकने नाबाद २९ धावांचे याेगदान दिले. 
 
हरभजनचे  तीन बळी
मुंबईकडून हरभजन सिंगने धारदार गाेलंदाजी करताना झटपट विजय निश्चित केला. त्याने चार षटकांत २२ धावा देत तीन विकेट घेतल्या. लसिथ मलिंगा व कर्ण शर्मानेही शानदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी दाेन गडी बाद केले. मॅक्लिनघन व जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतला.
 
हेही वाचा, 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...