आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीची पुण्यावर मात; दिल्ली 97 धावांनी विजयी, संजू सॅमसनचे शतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कर्णधार जहीर खानच्या नेतृत्वाखाली दिल्ली डेअरडेव्हिल्सने दहाव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. दिल्लीने मंगळवारी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा ९७ धावांनी पराभव केला. युवा फलंदाज संजू सॅमसनच्या (१०२) झंझावाती फलंदाजीपाठाेपाठ कर्णधार जहीर खान (३/२०), पॅट कमिन्स (२/२४) अाणि अमित मिश्रा (३/११) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर दिल्लीने १६.१ षटकांत सामना जिंकला. दिल्लीचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. दुसरीकडे पुणे टीमला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने निर्धारित २० षटकांमध्ये ४ गड्यांच्या माेबदल्यात पुण्यासमाेर विजयासाठी २०६ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने १६.१ षटकांत अवघ्या १०८ धावांमध्ये गाशा गुंडाळला. धावांचा पाठलाग करणाऱ्या पुण्याकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक २० धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. माजी कर्णधार धाेनीने ११, कर्णधार रहाणेने १० अाणि डुप्लेसिसने ८ धावांची खेळी केली. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता अाला नाही. दिल्लीकडून जहीर खान अाणि अमित मिश्राने प्रत्येकी तीन गडी बाद केले. 

संजू सॅमसन सामनावीर
दिल्लीचा शतकवीर संजू सॅमसन (१०२) हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने करियर व यंदाच्या सत्रातील पहिले अाणि अातापर्यंतच्या अायपीएलमधील ४३ वे शतक ठाेकले. त्याने (२२ वर्षे, १५१ दिवस) ६३ चेंडूंत ८ चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे १०२ धावा काढल्या. याशिवाय शतक ठाेकणारा संजु हा दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला. यापूर्वी मनीष पांडे (१९ वर्षे, २५३ दिवस, २००९) अायपीएलमध्ये सर्वात युवा शतकवीर फलंदाज ठरला हाेता. शतक ठाेकणारा संजु हा १२ वा भारतीय फलंदाज ठरला. 
बातम्या आणखी आहेत...