आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डाने म्हटले होते, शास्त्री अहंकारी, तर कुंबळे मनमिळाऊ हे लक्षात घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मुडी यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांना सादरीकरणाच्या वेळी चांगलेच आश्चर्यचकित केले होते. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी दिलेले हे अर्ध्या तासाचे सादरीकरण रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांच्यापेक्षा वेगळेच होते. नंतर मुख्य प्रशिक्षकाच्या या निवड प्रक्रियेत सादरीकरणाबाबत खूप चर्चा झाली.
बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी विशेष चर्चेदरम्यान नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, फक्त सादरीकरण हाच मुद्दा असता तर मुडी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले असते; पण बीसीसीआयला सर्व मुद्द्यांवर विचार करून निर्णय घ्यायचा होता. खरे म्हणजे या सर्व प्रकरणात बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचाच शब्द चालला.
बीसीसीआयच्या दुसऱ्या सूत्रानुसार, मोठा खेळाडू हीच बाब अनिल कुंबळेंच्या पथ्यावर पडली. त्यांचा दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरला. खेळाबाबत गंभीर असणे या मुद्द्याबाबतही कुंबळे अव्वल ठरले. प्रशासक म्हणून कुंबळे याआधीही अयशस्वी ठरले आहेत. कर्नाटक क्रिकेट संघटनेत प्रशासक म्हणून कुंबळेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, याची बीसीसीआयला माहिती होती. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या बड्या खेळाडूंच्या सल्लागार समितीवर निवडीची जबाबदारी होती. कुठल्याही एका खेळाडूच्या नावावर या समितीचे एकमत झाले नाही. त्यामुळेच कोलकाता आणि नंतर धर्मशाला येथे झालेल्या बैठकीनंतरही प्रशिक्षकाची घोषणा होऊ शकली नव्हती. नंतर बीसीसीआयने ही निवड केली. शास्त्री भलेही प्रशिक्षक होऊ न शकल्याने वादात राहिले, पण बीसीसीआयची पसंती त्यांनाही नव्हती. ‘दिव्य मराठी’च्या माहितीनुसार, शास्त्री स्वत:पुरते मर्यादित आहेत, पद हे त्यांचे लक्ष्य आहे आणि खेळभावना त्यांच्यासाठी महत्त्वाची नाही, असे बीसीसीआयचे मत होते. या पैलूंवर कुंबळे सरस असल्याचे जाणवल्याने त्यांची निवड झाली.

जगातील सर्वात मोठ्या प्रशिक्षकपदाच्या वादाबाबत दोन महत्त्वाचे पैलू
> कुंबळेंनी ९ जूनला पदासाठी अर्ज केला, पण बीसीसीआयने जी २१ नावे निवडली होती, त्यात ते नव्हते. तेव्हा शास्त्री स्पर्धेत पुढे होते. समितीच्या बैठकीत कोणत्याही एका नावावर निर्णय झाला नाही. मंडळाने कुंबळेंची निवड केली. शास्त्रींच्या मते, गांगुली त्यांच्या सादरीकरणावेळी उपस्थित नव्हते, कारण सर्वकाही आधीपासूनच निश्चित होते.
> माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्रींना बॅटिंग कोच करण्याचा प्रस्ताव दिला होता, पण बीसीसीआय त्यास सहमत नव्हती. सादरीकरणानंतर अनिल कुंबळे आणि टॉम मुडींत स्पर्धा होती. मंडळाने कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला मत विचारले असता त्याने कुंबळेच्या नावावर सहमती दर्शवली.
पुढील स्लाइड्सवर वाचा.. दावेदारांचे कसे होते सादरीकरण
(सोबत चंदिगडहून विक्रम ढटवालिया यांचा वृत्तांत)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...