आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ZIM:IPL धुरंधर झिम्बाब्वे समोर फ्लॉप, हे 5 प्लेयर्स पराभवाचे व्हिलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- झिम्बाब्वेने 3 सामन्यांच्या मालिकेतील शनिवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 2 धावांनी पराभव केला. हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर 171 धावांचे लक्ष ठेवले होते. हे लक्ष IPL मध्ये धुरंधर ठरलेल्या भारतीय खेळाडूंना गाठता आले नाही.
भारताला अखेरच्या 4 ओव्हरमध्ये केवळ 41 धावाच करायच्या होत्या, मात्र 38 भारतीय खेळाडूंना केवळ 38 धावाच करता आल्या आणि भारतीय संघ 20 ओव्हरच्या या सामन्यात 6 विकेटच्या बळावर केवळ 168 धावाच करू शकला. आता झिम्बाब्वे या मालिकेत 1-0 ने अघाडीवर आहे. दुसरा सामना 20 जून ला हरारे येथेच खेळला जाणार आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये भारताचा पराभव
- अखेरच्या ओव्हमध्ये संकटात सापडलेल्या भारतीय संघाला कर्णधार धोनी (19*) आणि अक्षर पटेल (18*) ने विजयाच्या अगदी नजिक पोहोचवले होते.
- मात्र कर्णधार धोनी यावेळी विजयासाठी अखेरच्या चेंडूनर लागत असलेल्या चार धावा करू शकला नाही.
- भारताकडून मनीष पांडे (48) ने सर्वाधिक धावा केल्या तर मनदीपसिंहने 30 धावांची खेळी केली.
- याआधी झिम्बाब्वेने निर्धारित 20 ओव्होर्समध्ये 6 विकेटच्या बळावर 170 धावा करून भारतासमोर मोठे आव्हान ठेवले होते.
- झिम्बाब्वेकडून एल्टन चिगुंबराने 26 बॉल खेळत 7 सिक्स आणि एक चौकार ठोकत 54 धावा केल्या.
बातम्या आणखी आहेत...