आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Fixed Manchester Test Claims Sunil Dev Then Denied

धोनीनेच केला होती तो सामना फिक्स, आरोप करून संघ व्यवस्थापकाचा यूटर्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमएस धोनी (फाइल फोटो). - Divya Marathi
एमएस धोनी (फाइल फोटो).
नवी दिल्ली- भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक सुनील देव यांनी कर्णधार महेंद्र धोनीवर गंभीर आरोप केले होते. धोनीच्या नेतृत्त्वाखाली 2014 मध्ये मॅनचेस्टरमध्ये खेळण्यात आलेला भारत विरुद्ध इंग्लंड सामना फिक्स होता, असे देव यांनी म्हटले होते. मात्र, एका स्टिंग ऑपरेशनमधून सत्य बाहेर आल्यानंतर देव यांनी यूटर्न घेतला. सुनील देव सध्या डीडीसीएचे सचिव आहेत.
काय खरे...? काय म्हणाले सुनील देव...?
- देव म्हणाले, ‘सर्व आरोप बिनबुडाचे आहे. मीडिया हाऊसला मी कोर्टात खेचणार आहे. एवढेच नाही तर, ज्यांनी ज्यांनी हे खोटे-नाटे पसरवण्याचा प्रयंत्न केला, त्यांच्यावरही कायदेशीर करावाई करणार आहे. ’
- रविवारी एका मीडिया हाऊसने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सत्य माहिती समोर आली. त्यात धोनीवर आरोप करतानाचा सुनील देव यांचा आवाज ऐकू येत आहे.
- देव 2014 मधील भारत- इंग्लंड यांच्यात मॅन्चेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याविषयी बोलत आहेत.
- स्टिंगमध्ये सुनील देव म्हणत आहेत की,‘पावसाच्या शक्यतेमुळे खेळपट्टीचा अंदाज घेत बैठकीत ठरवण्यात आले होते, की आपम प्रथम गोलंदाजी करायची, मात्र धोनीने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन मला आश्चर्यचा धक्का दिला. एवढेच नाही तर इंग्लंडचे माजी क्रिकेटर ज्योफ बायकॉटही धोनीच्या या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाले होते.’
- देव यांच्यानुसार, धोनीने हा निर्णय जाणून बुजून घेतला होता आणि त्यांना यावर 100 टक्के विश्वास आहे की, धोनीने सामना फिक्स केला.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, देव यांनी त्यावेळीही बीसीसीआयला पत्र लिहिले होते. याची कल्पना बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनाही होती.
- मात्र, देव यांना ही बाब सर्वांसमोर आणण्याची इच्छा नव्हती. त्यांना असे वाटते की, लोकांचा या गोष्टीवर विश्वास नाही. बोर्डानेही या गोष्टीची प्रशांसा केली, मात्र कोणतेही मत प्रदर्शित केले नाही. .

काय झाले सामन्यात?
- 2014 मध्ये मालिकेच्या चौथ्या सामन्यात पाऊस झाला होता. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- भारताने पहिल्या डावात 152 तर दुसऱ्या डावात 161 धावा केल्या.
- इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 54 धावांनी जिंकला होता.
- या सामन्यात इंग्लंडने एकाच डावात 367 धावा केल्या होत्या.
- सामन्यात कर्णधार धोनीने 92 धावा ( पहिल्या डावात 71, दुसऱ्या डावात 21 ) केल्या होत्या. तो या सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तर, अश्विननेही या सामन्यात 86 धावा ( पहिल्या डावात 40 आणि दुसऱ्या डावात 46) केल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या सामन्यातील काही खास PHOTO'S...