आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Ground Tests Remain Incomplete In Para Jumping Training

पॅराजंपिंग तर दुरच ग्राऊंट टेस्टही पूर्ण करु शकला नाही धोनी, फॅन्सची झाली निराशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लेनमधूल पॅराशूटच्या सहायाने जंप मारताना जवान. - Divya Marathi
प्लेनमधूल पॅराशूटच्या सहायाने जंप मारताना जवान.
आग्रा (उत्तर प्रदेश) - टीम इंडियाचा वनडे कर्णधार एमएस धोनीची ग्राउंड टेस्ट अर्धवट राहिल्याने सोमवारीदेखील त्याला पॅराजंपिंग करता आले नाही. मात्र 40 फूट ऊंचावरून जंप घेऊन संध्याकाळपर्यंत त्याला ही टेस्‍ट पुर्ण करता आली असती. ही टेस्ट पूर्ण केल्यानंतरच त्याला हरक्‍यूलस विमानातून पॅराशूटच्या सहायाने जंप घेण्याची संधी मिळणार आहे.
धोनीच्या बॅचच्या अनेक जवानांनी सोमवारी सकाळी सहा वाजता प्लेनमधून जंप केले. मलपुरा परिसरातील ड्रॉपिंग ग्राउंडमध्ये धोनीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आरमीच्या ज्युनिअर अधिकार्‍याचे कुटूंबीयदेखील धोनीला बघण्यासाठी येथे आले होते. सर्वांना असेच वाटत होते की आज धोनी जंप करेल. मात्र फॅन्सबरोबरच त्यालाही निराशच व्हावे लागले.

भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ग्राउंड टेस्‍ट एमएस धोनीच्या धैर्याची परिक्षा आहे. जर जंप घेताना त्याचे हार्टबीट्स वाढले तर, त्याला अधिक प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला जाईल. त्याच्या बॅचच्या अनेक जवानांनी ही टेस्ट पार केलेली आहे. आता तो मंगळवारी किंवा बुधवारी हरक्‍यूलस विमानाच्या सहायाने जंप करणार आहे.

विशेष पॅराशूटने धोनी करणार जंप
धोनी 1200 फुट एवढ्या ऊंचीवरून जंप करणार आहे. स्‍टॅटिक लाईन पॅराशूट परिधान करून तो ही जंप मारेल. या पॅराशूटचे विशेष म्हणजे, याला उघडण्याची गरज नसते. विमानातून जंप मारताच या पॅराशूटला असलेली दोरी हवेच्या दाबामुळे तुटते आणि पॅराशूट ओपन होते. यानंतर त्याला जमिनिवर येण्यासाठी 50 सेकंद लागतात. या वेळी धोनीजवळ आमखी एक पॅराशूट असेल, जे त्याच्या छातीवर बांधलेले असेल. जर, पहिले पॅराशूट ओपन होऊ शकले नाही तर, या पॅराशूटला ओपन करावे लागेल. या विमानातून एकाच वेळी 24 जवान जंप मारतात. या नंतर विमान पुन्हा हवेत घिरट्या घलते अाणि काही वेळाने परत एवढेच जवान पॅराशूटमधून जंप मारतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...