आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरा जंपिंगपूर्वीचे धोनीचे फोटो व्‍हायरल, पहाटे चारला उठतो माही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडीयावर व्‍हायरल झाले धोनीचे फोटो. - Divya Marathi
सोशल मिडीयावर व्‍हायरल झाले धोनीचे फोटो.
आग्रा - स्‍टार क्रिकेटर आणि मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्र सिंह धोनीचे पॅरा जंपिंगपूर्वीचे फोटो व्‍हायरल झाले आहेत. फोटोमध्‍ये धोनी सैन्‍याच्‍या वर्दीमध्‍ये दिसत आहे. काही व्‍हॉट्स अप ग्रुपवर हे फोटो शेअर होताना दिसत आहेत. धोनी पॅरा जंपिंगसाठी स्‍वत:ला तयार करत आहे. मागील काही दिवसांपासून तो सैनिकांसोबत प्रशिक्षण घेत आहे. पुढील तीन दिवसांमध्‍ये तो वायुसेनेच्‍या जहाजातून प्रॅक्‍टिस जंप घेणार आहे. त्‍यासाठी त्‍याला हाईट आणि लँडिंगची माहिती देण्‍यात येत आहे. धोनीला पाहण्‍यासाठी मलपूरा झोन येथे त्‍याच्‍या चाहत्‍यांची गर्दी होत आहे. मात्र, सैन्‍याचा परिसर असल्‍याने धोनीला पाहण्‍यासाठी लोकांना येथे येता येत नाही.
पहाटे चार वाजता उठतो धोनी
पॅरा ट्रेनिंग स्‍कुलमध्‍ये धोनी पहाटे चार वाजता उठत आहे. पहाटेच तो परेडमध्‍येही सहभागी होतो. रविवारी सकाळी वायुसेनेसोबत तो व्हॉलीबॉलही खेळला. सोमवारी वायुसेनेच्‍या परिसरात विविध ठिकाणी त्‍याने जेवण घेतले. सध्‍या मसालेदार पदार्थांपासून तो दूर राहत आहे व फिटनेसची काळजी घेत आहे. धोनीचे मैदानी प्रशिक्षण पूर्ण झाल्‍यावर त्‍याला विमानातून जंप घेण्‍याची संधी मिळणार आहे.
पुढील स्‍लार्इडवर क्‍लिक करून पाहा, धोनीचे संबंधित फोटो आणि त्‍याची 'क्रू कट' हेअरस्‍टाईल..