आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या कुशीत पाक कर्णधाराचा मुलगा, ट्विटर युजर्स म्हणाले- तो द्वेष नव्हे, प्रेमाचा संदेश देत आहे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरफराज म्हणतो, मी धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे. - Divya Marathi
सरफराज म्हणतो, मी धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे.
लंडन- ओव्हल येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमद याचा मुलगा अब्दुल्ला याला कडेवर घेतल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पाकिस्तान ट्विटर युजर्संनी याला सकारात्मक प्रतिसाद देत- '' धोनी द्वेष नव्हे तर प्रेम पसरवत आहे." अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सर्फराज म्हणतो, मी धोनीचा सर्वात मोठा फॅन
- सर्फराज म्हणतो, मी धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे. मी त्याला आदर्श मानतो.
- एप्रिल महिन्यात शाहिद आफ्रिदीच्या रिटायरमेंटच्या वेळी विराट कोहलीने आपल्या जर्सीवर मेसेज लिहीत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
- त्यानंतर शाहिद आफ्रिदीने ट्विट करत पूर्ण भारतीय संघाचे आभार मानले होते. 
 
सोशल मीडियावर येत आहेत प्रतिक्रिया
-  मनसब अली याने लिहिले आहे की, धोनीने कर्णधार सर्फराज अहमद याचा मुलगा अब्दुल्ला याला कुशीत घेतले असून ते द्वेष नव्हे तर प्रेम पसरवत आहेत.
- सारा नावाच्या एका पाकिस्तानीने लिहिले की, आपण येथे भांडण करत आहोत. तिथे एक लिजेंड सर्फराज अहमदच्या मुलाला कुशीत घेऊन उभा आहे.
- राणा नावाच्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, धोनी सर्फराज यांच्या मुलाला कुशीत घेऊन उभे आहेत. त्यामुळे सर्फराज ट्रॉफी उचलू शकतो का? धोनी खरोखरच एक महान व्यक्ती आहे. मी त्याचा सन्मान करतो.
- @MuchFanatic ट्विटर हॅंडलवर लिहिले आहे की, धोनी हे खेळाडूपेक्षा जंटलमन आहेत.
- खालिद महमूद लिहितो की, धोनीने कर्णधार सर्फराज अहमद याचा मुलगा अब्दुल्ला याला कुशीत घेणे हेच दर्शवते की क्रिकेट फक्त एक खेळ आहे.
- मोहंमद हारुण लिहितो की धोनीने कर्णधार सर्फराज अहमद याचा मुलगा अब्दुल्ला याला कुशीत घेतले आहे याचाच अर्थ भारतीय वाईट नाहीत.
 
भारत-पाकिस्तानमध्ये झालेत 11 अंतिम सामने

- भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 11 अंतिम सामने झाले आहेत. यातील 4 सामने भारताने तर 7 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. यातील 4 सामने भारताने शारजा येथे हारले होते. रविवारी होणारा सामना हा 12 वा अंतिम सामना आहे. 
बातम्या आणखी आहेत...