आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंची निवड आज; धोनी, रैना, रहाणेवर असेल लक्ष !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलमधील दोन नवे संघ पुणे आणि राजकोट मंगळवारी आपले प्रमुख खेळाडू खरेदी करतील. धोनी आणि रैनाला कोण खरेदी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. धोनी आठ वर्षांनंतर चेन्नई सोडून दुसऱ्या संघाकडून खेळेल. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे निलंबित चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना ड्राफ्टमध्ये दोन गटांत विभागण्यात आले आहे. हे खेळाडू कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा गटांत असतील. यातील आघाडीच्या खेळाडूंना ड्राफ्ट प्रक्रियेद्वारे विकले जाईल. दोन्ही नवे संघ पुणे आणि राजकोटकडे कमीत कमी ४० कोटी आणि अधिकाधिक ६६ कोटी रुपये पर्स असेल. यातूनच त्यांना खेळाडूंची निवड करावी लागेल.
महेंद्रसिंग धोनीशिवाय रवींद्र जडेजा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी यांच्यावरसुद्धा दोन्ही नव्या टीमचे लक्ष असेल. या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. आयपीएल-६ भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीने चेन्नई आणि राजस्थानला आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. या दोघांच्या जागी आता संजीव गोयंका यांची न्यू रायझिंग पुणे तसेच मोबाइल निर्माती इंटेक्स राजकोट फ्रँचायझी मालक बनले आहेत. पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ दोन वर्षांसाठीच आयपीएल-२० लीगमध्ये सहभागी होतील. निलंबनाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर चेन्नई आणि राजस्थान आयपीएलमध्ये पुनरागमन करतील.

मंगळवारी मुंबईच्या बंाद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित ड्राफ्ट प्रक्रियेत निलंबित चेन्नई आणि राजस्थानचे एकूण ५० खेळाडू उपलब्ध असतील. पुण्याला खेळाडू निवडीची संधी आधी मिळेल. कारण त्यांनी उलट बोली प्रक्रियेत सर्वात कमी बोली लावली होती. ड्राफ्ट प्रक्रियेत नव्या फ्रँचायझी टीमसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंत ब्रेंडन मॅक्लुम, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, वेस्ट इंडीजचा डेवेन ब्राव्हो, डेवेन स्मिथही उपलब्ध असतील. आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई आणि राजस्थानचे सहमालक सामील असल्याचे आढळल्यानंतर आयपीएलच्या पुढच्या सत्रासाठी पुणे, राजकोट या दोन नव्या टीम निवडाव्या लागल्या.
धोनीची उजवी बाजू
{उत्तम कर्णधार. चेन्नईला दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले. चार वेळा उपविजेतेपद. { टी-२० आणि वनडेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून धोनीची ओळख. { मर्यादित षटकांच्या खेळात धोनी उत्तम फिनिशर आहे. { कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता धोनीकडे आहे. { अखेरच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा कर्णधार म्हणून त्याची आेळख. { परिपक्व खेळाडू. संपूर्ण टीमला एकसंघ ठेवण्यात माहीर.
पुणे टीममध्ये धोनीची निवड शक्य
पुणे फ्रँचायझीला खेळाडू निवडण्याची पहिली संधी असल्यामुळे त्यांच्यासमोर महेंद्रसिंग धोनीच्या रूपाने पहिली सर्वश्रेष्ठ चॉइस असेल. धोनीला निवडण्याची संधी कोणतीही टीम सोडणार नाही हे स्पष्ट आहे. यामुळे धोनीचा पुणे संघातील समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजासाठी राजकोटची टीम प्रयत्नशील असेल. जडेजा सौराष्ट्रचा खेळाडू असून राजकोट हे त्याचे होमग्राउंड आहे. यामुळे जडेजाचा समावेश करण्यासाठी राजकोटचे प्रयत्न असेल.
बातम्या आणखी आहेत...