आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांत धोनीने नेतृत्वाला नवी उंची दिली : कोच कुंबळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचे कोच अनिल कुंबळेंनी वनडे, टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची मुक्तकंठाने स्तुती केली. धोनीचे नेतृत्व शानदार होते. त्याचा संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत उत्तम ताळमेळ होता. धोनीने नेतृत्वाला एका नव्या उंचीवर पोहोचवले, असे कुंबळे यांनी म्हटले.  

कुंबळेंनी धोनीची स्तुती करताना म्हटले की, २००७ ते २०१७ पर्यंतचा कालावधी मोठा आहे. या काळात धोनीने नेतृत्वाचे नवे कीर्तिमान प्रस्थापित केले. धोनी कर्णधार झाला त्या वेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविडसारखे बरेच सीनियर खेळाडू संघात होते. धोनीने या वरिष्ठ खेळाडूंसोबत उत्तम ताळमेळ दाखवला आणि संघाला अनेक मोठे यश मिळवून दिले.’ धोनीने नेतृत्व सोडले याबाबत विचारले असता कुंबळेंनी म्हटले की, ‘आपण शानदार लयीत असताना संघाचे नेतृत्व सोडणे सोपा निर्णय नाही. धोनीसारखा दिग्गज खेळाडूच असा निर्णय घेऊ शकतो. कोहलीच्या हाती नेतृत्व सोपवण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्याला वाटले आणि त्याने तेच केले,’ असेही त्यांनी नमूद केले.