आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये धोनी प्रथमच फेल, या 6 कारणांमुळे सेमीमधून बाहेर होत आहे टीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महेंद्रसिंग धोनीचे नाव येताच त्याचे जादुई नेतृत्व आणि "कॅप्टन कूल' म्हणून त्याची प्रतिमा समोर येते. मात्र, आयपीएल-९ मध्ये त्याची जादू दिसली नाही. त्याची टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सने ८ पैकी ६ सामने गमावले अाहेत. यामुळे आता पुणे संघाचा सेमीफायनल प्रवेशाचा मार्ग कठीण झाला आहे.

धोनी यंदा आयपीएलची नवी टीम पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व करीत आहे. त्याने याआधी आठ सत्रात चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व केले होते. यात दोन वेळा सुपरकिंग्ज चॅम्पियन बनली. चार वेळा उपविजेती होती. दोन वेळा चॅम्पियन लीग चॅम्पियनही ठरली. यामुळे निश्चितपणे या वेळी पुणे फ्रँचायझीला धोनीकडून भरपूर आशा असतील यात शंका नाही. मात्र, टीम कॉम्बिनेशन म्हणा की आणखी काही...धोनी या वेळी टीम आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. याची काही कारणे अशी..

नव्या खेळाडूंशी ताळमेळ :
अश्विन, रहाणे, एल्बी मोर्केल यांना वगळता बहुतेक खेळाडू धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा खेळत आहेत. यामुळे टीम कॉम्बिनेशन बनवण्यात वेळ लागत आहे.

अश्विनचे फ्लॉप शो :
रविचंद्रन अश्विन जगातल्या सर्वश्रेष्ठ ऑफस्पिनरपैकी एक आहे. आयपीएलमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. मात्र, या वेळी ८ सामन्यांत त्याला केवळ ३ विकेट मिळाल्या.

दुबळी गोलंदाजी :
धोनीच्या संघात अश्विन वगळता असा एकही गोलंदाज नाही, ज्याला मॅचविनर म्हणू शकतो. ईशांत शर्मा, रुद्रप्रतापसिंग, इरफान पठाणसारखे वेगवान गोलंदाज अपयशी ठरले.

पुण्याकडे हार्डहिटर नाही
अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ पुण्याकडून सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरले. मात्र, हे दोघे हार्डहिटर नाहीत. यामुळे पुणे सुरुवातीच्या षटकांत विरोधी टीमवर दबाव निर्माण करण्यात अपयशी.

दुखापतींनी संकट वाढले
धोनीच्या संघातील विदेशी खेळाडू केविन पीटरसन, डुप्लेसिस, मार्श दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत. यामुळे पुण्यासमोर संकट वाढले.

मोठी खेळी करण्यात अपयशी
धोनी स्वत: या वेळी प्रभावी फलंदाजी करू शकला नाही. त्याने ८ सामन्यांत केवळ १४१ धावा काढल्या. त्याचा सर्वोच्च स्कोअर ४१ धावा आहे.
पुढील स्लाइडमध्ये, कोणती टीम कोणत्या ठिकाणी
बातम्या आणखी आहेत...