आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2007 च्या वर्ल्ड कप पराभवानंतर वाटले, आम्ही गुन्हेगार आहोत की दहशतवादी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्णधार महेंद्रसिंग धोनी... - Divya Marathi
कर्णधार महेंद्रसिंग धोनी...
न्यूयॉर्क- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आजकाल मैदानापासून दूर आहे. सध्या टी-20 किंवा वन-डे सामन्याची धावपळ नाही. म्हणून धोनी कुटुंब 'एम. एस. धोनी - अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटासाठी वेळ काढणार आहे. ही मंडळी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये होती. फॉक्स बिल्डिंगमध्ये पत्रकार परिषद सुरू होती. 2007 मधील विश्वचषकातील पराभवाबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा धोनी थोडा भावुक झाला. तो म्हणाला, पराभवानंतर आम्ही दिल्लीत पोहोचलो तर असे वाटत होते की आम्ही गंभीर गुन्हाच केलाय. कुणाची हत्या केली किंवा जणू आम्ही अतिरेकीच आहोत. धोनीची भावना त्याच्याच शब्दांत...
- 'दिल्लीत विमानतळावर आम्ही पोहोचलो तेव्हा माध्यमांची प्रचंड गर्दी होती. लोकांना असे वाटले असेल की पराभवाचे आम्हाला काहीच शल्य नव्हते.
- मात्र, एक खेळाडू म्हणून प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्हाला खूप भक्कम असायला हवे. एखादी पत्रकार परिषद घेऊन पराभवाचे रडगाणे गावे, अशी ही वेळ नसते.
- तेव्हा आम्हाला एका पोलिस गाडीत बसवून बाहेर काढण्यात आले.
- मी वीरूच्या (वीरेंद्र सेहवाग) शेजारी बसलो होतो. सायंकाळ झाली होती. 60 ते 70 किमी वेगाने आम्ही जात होतो.
- या वेगातही माध्यमांची वाहने आमच्या शेजारून धावत होती. ही मंडळी आमचा असा पाठलाग करत असताना असे वाटत होते की, जणू आम्ही अतिरेकीच आहोत.
- काही वेळानंतर आम्ही एका पोलिस ठाण्यात पोहोचलो. काही वेळ थांबलो. 15-20 मिनिटांनी आम्हाला आमच्या कारनी सोडण्यात आले. या घटनेने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला.
पुढे आणखी वाचा, धोनी म्हणाला, 'मी नेहमी चांगला माणूस, उत्तम क्रिकेटर होण्यावरच लक्ष दिले...'
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...