आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय हजारे ट्रॉफी: धोनीचे तुफानी शतक; झारखंड विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/कटक - शनिवारी पुण्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कर्णधारपद सोडणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा रंगात दिसला. धोनीने सहा गगनभेदी षटकार ठोकून शतक झळकावले. धोनीच्या शतकाने झारखंडला ६ बाद ५७ धावा अशा संकटमय स्थितीतून बाहेर काढताना ९ बाद २४३ धावांपर्यंत पोहोचवले. यानंतर झारखंडच्या गोलंदाजांनी  छत्तीसगडला १६५ धावांत रोखून ७८ धावांनी रोमांचक विजय मिळवला. धाेनीने १२ वर्षानंतर झारखंडकडून शतक ठाेकले.
 
झारखंड टीम प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ५७ धावा अशी संकटात सापडली होती. धोनीने संकटमोचकाची भूमिका पार पाडताना शतक ठोकून संघाला संकटातून बाहेर काढले. धोनीने ६ गगनभेदी षटकार आणि १० चौकारांच्या साह्याने १०७ चेंडूंत १२९ धावांची तुफानी खेळी केली. धोनीने हे शतक १२०.५६ च्या स्ट्राइक रेटने ठोकले. या शतकाने झारखंडला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. धोनी मैदानावर आला तेव्हा झारखंडची टीम ४३ धावा ४ विकेट अशी अडचणीत होती. धोनी खेळपट्टीवर असताना संघाने १४ धावांत इशांक जग्गी आणि कौशलसिंग यांच्या विकेट गमावल्या. यानंतर धोनीने शाहबाज नदीम (५३) सोबत मिळून १५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून सामन्यात पुनरागमन केले. धोनी अखेरच्या चेंडूवर २४३ धावांच्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर झारखंडच्या गोलंदाजांनी छत्तीसगडला १६५ धावांत रोखले. 

महाराष्ट्राची केरळवर मात  
महाराष्ट्राने केरळला १२२ धावांनी हरवले. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना  सर्वबाद ३११ धावा काढल्या. रुतुराज गायकवाडने ७९, केदारने ७१, नौशाद ने ५७ धावांचे योगदान दिले. विजय झाेल ५ व अंकित बावणे १ धाव काढून बाद झाले. ३१२ धावांचा पाठलाग करताना केरळचा डाव अवघ्या ३९.५ षटकांत १८९ धावांत आटोपला.
 
बातम्या आणखी आहेत...