आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीचे राजीनामापत्र लीक; दबावात सोडले नेतृत्व? म्हणाला- मी कोहलीचा मेंटर बनण्यास तयार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चार दिवसांपूर्वी टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणारा महेंद्रसिंग धोनीचा रेझिग्नेशन मेल (राजीनामापत्र) समोर आला आहे. यात धोनीने ज्या शब्दांचा उपयोग केला अाहे, त्याच्यावर नेतृत्व सोडण्यासाठी दबाव तर टाकण्यात आला नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. चार जानेवारी रोजी धोनीने बीसीसीआयला मेल केला होता. त्या मेलमध्ये धोनीने लिहिले की, मी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर करत असून कोहलीचा मेंटर बनण्यास तयार आहे. यावरून संघात कायम राहण्यासाठी धोनीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
  
इंग्लंडविरुद्ध संघाच्या घोषणेबाबत निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यात अनेक वेळा चर्चा झाली. २०१९ चा वर्ल्डकप लक्षात घेता आता त्यानुसार टीम तयार करण्याची वेळ आली आहे, असे या चर्चेचे मूळ होते. कोहलीने कसोटीत चांगले निकाल दिले आणि टी-२० मध्येसुद्धा त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर धोनीने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. संघात बदलासाठी आपण तयार असल्याचे धोनीने त्यांना सांगितले. शिवाय इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोहलीला तयार करण्यास मदत करण्याचेही धोनीने कबूल केले.
 
इकडे कोहली म्हणाला, धोनीने मला अनेक वेळा वाचवले..
- धोनी माझ्यासाठी सदैव कर्णधार असेल. इतकेच नव्हे, तर त्याने अनेकदा मला संघाबाहेर होण्यापासून वाचवले. धोनी माझा संरक्षकसुद्धा आहे, असा खुलासा टीम इंडियाचा नवा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.

- कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले. अगदी सुरुवातीच्या काळात कोहली वनडे आणि कसोटी संघात सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नव्हता. यामुळे त्याचे संघातील स्थान अनिश्चित होते. मात्र, धोनीने नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या गुणवत्तेला हेरून कोहलीचे समर्थन केले.

- ‘धोनी तो व्यक्ती आहे, ज्याने माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मला अनेकदा संधी दिली.  शिवाय एक क्रिकेटपटू म्हणून उदयाला येण्यास पुरेसा वेळ दिला. त्याने नेहमी मला मार्गदर्शन केले आणि मला संधी दिली. मला संघाबाहेर होण्यापासून धोनीने अनेकदा वाचवले,’ असे कोहली म्हणाला.
 
पुढिल स्लाइडवर वाचा...
-भारतीय संघनिवडीवर हरभजनची टीका !
- सौरव गांगुलीला युवराजवर विश्वास
बातम्या आणखी आहेत...