आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilshaan Crossed 10 Thousand Runs In One Day Career

... दसहजारी दिलशान, वनडे करिअरमध्ये गाठला दहा हजार धावांचा पल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हंबनटाेटा - श्रीलंकेचा स्टार फलंदाज तिलकरत्ने दिलशानने रविवारी अापल्या वनडे करिअरमध्ये एका नव्या विक्रमाची नाेंद केली. त्याने अांतरराष्ट्रीय वनडेत दहा हजार धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. श्रीलंकेच्या दिलशानने रविवारी पाकिस्तानविरुद्ध मालिकेतील पाचव्या अाणि शेवटच्या वनडेत हे यश संपादन केले. या सामन्यात ६३ धावांची खेळी करून दिलशानने वनडेत १० हजार ८ धावा पूर्ण केल्या. त्यामुळे श्रीलंका टीमला प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या माेबदल्यात ३६८ धावा काढता अाल्या.

वनडेत दहा हजार धावा पूर्ण करणारा श्रीलंकेचा दिलशान हा जगातील ११ वा फलंदाज ठरला.

संगकाराचा विक्रम ब्रेक
दिलशानने ३१९ वनडेतील २९३ डावांत दहा हजार धावा पूर्ण केल्या. यासह त्याने अापल्याच देशाच्या कुमार संगकाराच्या विक्रमाला मागे टाकले. संगकाराने २९६ डावांत दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम हाेता. जयसूर्याने हे यश ३२८ डावांत अाणि महेला जयवर्धनेने ३३३ डावांत खेळून मिळवले.

३१९ वनडे
२२ शतके
४५ अर्धशतके
३९.७१ सरासरी

श्रीलंकेचा चाैथा फलंदाज
वनडेत दहा हजार धावा पूर्ण करणारा दिलशान हा श्रीलंकेचा चाैथा फलंदाज ठरला. यापूर्वी जयसूर्या, जयवर्धने व संगकारानेही धावा काढल्या.