आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinesh Karthik And Dipika Pallikal Got Married By Christian Tradition

PHOTOS: दिनेश-दीपिका लग्नाच्या बेडीत, उद्या होणार हिंदू पद्धतीने विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लिकल लग्नाच्या बेडीत अडकले. काल सायंकाळी चेन्नईतील एका चर्चमध्ये झालेल्या समारंभात ख्रिश्चन पद्धतीने दोघांनी लग्न केले. यावेळी दोघांनी अत्यंत जवळचे मित्र आणि नातलग उपस्थित होते. या समारंभाला दीपिकाने ऑफ व्हाईट गाऊन परिधान केला होता तर दिनेशने प्लॅक थ्री पीस सुट घातला होता. दोघे उद्या चेन्नईत हिंदू पद्धतीने (तेलुगु-नायडू स्टाइल) पुन्हा लग्न करणार आहेत.
पुन्हा लग्न का करणार
दीपिका ख्रिश्चन तर दिनेश हिंदू धर्माचा आहे. त्यामुळे दोघांनी दोन्ही पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मंदिरात हिंदू पद्धतीने होणाऱ्या लग्नासाठी दीपिकाने लहंगा घेतला आहे. दोघांनी लग्नाची पूर्ण खरेदी अमेरिकेतून केल्याचे समजते.
लग्नापूर्वी दिली होती पार्टी
या विकेंडला दिनेश आणि दीपिकाने आपल्या मित्रांना पार्टी दिली होती. या पार्टीला 15 जवळचे मित्र उपस्थित होते. या पार्टीचा ड्रेस कोड पिंक ठेवण्यात आला होता. दीपिकाला हा रंग खुप आवडतो. या पार्टीत दीपिकाची ऑस्ट्रेलियन कोच साराह फिट्ज गेराल्ड याही आल्या होत्या.
कार्तिकचे दुसरे लग्न
हे कार्तिकचे दुसरे लग्न असणार आहे. त्याने पहिल्या पत्नीशी घटस्पोट घेतला आहे. 2007 मध्ये कार्तिकने त्याची लहाणपणची मैत्रिन निकिताबरोबर लग्न केले होते. कार्तिक आणि निकिताचे कुटुंबीय हे चांगले मित्र आहेत. सोबत खेळता-खेळत ते दोघे प्रेमात पडले आणि गोष्ट लग्नापर्यंत गेली, मात्र या लग्नाचा लवकरच शेवट झाला. 2012 मध्ये सहकारी क्रिकेटर मुरली विजयशी निकिताचे अफेअर असल्याने कार्तिकने तिला घटस्पोट दिला होता.
2013 मध्ये झाला होता दीपिकाशी साखरपुडा
कार्तिक आणि दिपिका यांची ओळख फेब्रुवारी 2013 मध्ये झाली होती. आणि याच वर्षी दोघांचा साखरपुडाही झाला. साखरपुड्यानंतरही या यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले नव्हते. मात्र, आयपीएल-8 च्या एका मॅच मध्ये दीपिका स्टेडिअमवर कार्तिकला चीअर करण्यासाठी आली होती.
ऑक्टोंबर 2014 मध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कार्तिक आणि दीपिका यांनी सांगितले होते की, ते 2015 मध्ये लग्न करू शकतात.
पुढील स्लाईडवर बघा, दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल यांच्या लग्नाचे फोटो....