आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinesh Karthik And Dipika Pallikal To Marry Twice

दिनेश- दीपिका अडकणार लग्नाच्या बेडीत, तीन दिवसांत दोनवेळा करणार लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कार्यक्रम प्रसंगी कार्तिकसह दीपिका आणि तिचे  आई वडिल. - Divya Marathi
एका कार्यक्रम प्रसंगी कार्तिकसह दीपिका आणि तिचे आई वडिल.
चेन्नई - क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल मंगळवारी चेन्नईत लग्नाच्या बेडीत अडकले. ख्रिश्चन रिवाजानुसार हा विवाह झाला. २० ऑगस्टला हिंदू रिवाजानुसार लग्न होईल, दीपिका ख्रिश्चन, तर दिनेश हिंदू आहे.

दोन वेळा करणार लग्न
कार्तिक आणि दीपिका दोनवेळा लग्न करणार आहेत. पहिल्यांदा ख्रिश्चन पद्धतीने, तर नंतर 20 ऑगस्टला हिंदू पद्धतीने (तेलुगु-नायडू स्टाईल) हा विवाह संपन्न होईल. या दोन्ही पद्धतीने पार पडणारा हा विवाह समारंभ चेन्नईमध्ये होणार आहे.
दीपिका ख्रिश्चन कुटुंबातील तर, दिनेश हिंदू आहे. यामुळे हा विवाह समारंभ दोन्ही धर्मांच्या रिती-रिवाजने पार पडणार आहे. कुटुंबातील एका सद्स्याने सांगितल्याप्रमाणे दीपिकाने लग्नाची संपूर्ण खरेदी अमेरिकेतून केली आहे. तिने ख्रिश्चन आणि हिंदू रीति-रिवाजाने लग्न करण्यासाठी गाऊन आणि लहेंगा खरेदी केला आहे.
कार्तिकचे दुसरे लग्न
हे कार्तिकचे दुसरे लग्न असणार आहे. त्याने पहिल्या पत्नीशी घटस्पोट घेतला आहे. 2007 मध्ये कार्तिकने त्याची लहाणपणची मैत्रिन निकिताबरोबर लग्न केले होते. कार्तिक आणि निकिताचे कुटुंबीय हे चांगले मित्र आहेत. सोबत खेळता-खेळत ते दोघे प्रेमात पडले आणि गोष्ट लग्नापर्यंत गेली, मात्र या लग्नाचा लवकरच शेवट झाला. 2012 मध्ये सहकारी क्रिकेटर मुरली विजयशी निकिताचे अफेअर असल्याने कार्तिकने तिला घटस्पोट दिला होता.

लग्ना आधी दिली होती पार्टी
दीपिका आणि दिनेश कार्तिक यांनी आठवड्याच्या शेवटी मित्रांना एक पार्टी दिली होती. या पार्टीचा ड्रेस कोड दीपिकाचा फेव्हरिट कलर पिंक ठेवण्यात आला होता. या पार्टीत दिपिकाची ऑस्ट्रेलिअन कोच साराह फिट्स गेराल्डदेखील सहभागी झाली होती.
5 गाण्यांवर डांसची तयारी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने लग्नात डांस करण्यासाठी तीन दिवस प्रॅक्टिस केली आहे. संगीत सेरेमनीच्या वेळी 5 गाण्यांवर दीपिका आणि दिनेश परफॉर्म करणार आहेत.
2013 मध्ये झाला होता दीपिकाचा साखरपुडाः
दीपिका आणि कार्तिक यांची ओळख फेब्रुवारी 2013 मध्ये झाली होती. आणि याच वर्षी दोघांचा साखरपुडाही झाला. साखरपुड्यानंतरही या कपलने, त्यांचे नाते सार्वजनिक केले नव्हते. मात्र, आयपीएल-8 च्या एका मॅच मध्ये दीपिका स्टेडिअमवर कार्तिकला चीअर करण्यासाठी गेली होती.

ऑक्टोंबर 2014 मध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कार्तिक आणि दीपिका यांनी सांगितले होते की, ते 2015 मध्ये लग्न करू शकतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचे काही निवडक फोटोज...