आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinesh Karthik And Squash Champion Dipika Pallikal To Tie The Yesterday

आधी अशी दिसायची दिनेशची दीपिका, हे आहेत तिचे 10 खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- करिअरच्या सुरूवातीची आणि आताची (उजव्याबाजूला) दीपिका पल्लीकल.)
भारताची टॉप स्क्वॅश वुमन प्लेअर दीपिका पल्लीकलने मंगळवारी क्रिकेटर दिनेश कार्तिकशी लग्न केले. ते दोघे मागील दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दीपिकाचे हे पहिले, तर दिनेश कार्तिकचे हे दुसरे लग्न होते. दिनेशने पहिले लग्न बालपणीची मैत्रिण निकितासोबत केले होते. मात्र या दोघांनीही 2013 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर दिनेश दीपिकाच्या प्रेमात पडला.

2013 मध्ये झाला होता दीपिकाचा साखरपुडाः
दीपिका आणि कार्तिक यांची ओळख फेब्रुवारी 2013 मध्ये झाली होती. याच वर्षी दोघांचा साखरपुडाही झाला. साखरपुड्यानंतरही या कपलने, त्यांचे नाते सार्वजनिक केले नव्हते. मात्र, आयपीएल-8 च्या एका मॅचमध्ये दीपिका स्टेडिअमवर कार्तिकला चीअर करण्यासाठी आली होती.
लग्नाआधी दिली होती पार्टी
दीपिका आणि दिनेश कार्तिक यांनी आठवड्याच्या शेवटी मित्रांना एक पार्टी दिली होती. या पार्टीचा ड्रेस कोड दीपिकाचा फेव्हरेट कलर पिंक ठेवण्यात आला होता. या पार्टीत दिपिकाची ऑस्ट्रेलिअन कोच साराह फिट्स गॅराल्डदेखील सहभागी झाली होती.
दीपिकाने केली 5 गाण्यांवर डान्स करण्याची तयारी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने लग्नात डान्स करण्याची तीन दिवस कसून प्रॅक्टिस केली. संगीत सेरेमनीच्या वेळी 5 गाण्यांवर दीपिका आणि दिनेश परफॉर्म करणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमरस दीपिका पल्लीकलचे काही निवडक फोटो...