(फोटो ओळ- दीपिकाला लग्नाचा टिळा लावताना दिनेश कार्तिक.)
चेन्नई- क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लिकल यांचा नुकताच ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला होता. मात्र आज पुन्हा चेन्नई येथे दोघे हिंदू पद्धतीने (तेलुगु-नायडू स्टाइल) विवाहबद्ध झाले. विवाहाप्रसंगी या दोघांनीही जवळच्या सर्व मित्रमंडळींना बोलावले आहे.
का करणार पुन्हा लग्नः
दीपिका ख्रिश्चन तर दिनेश हिंदू धर्माचा आहे. त्यामुळे दोघांनी दोन्ही पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मंदिरात हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नासाठी दीपिकाने लहंगा घातला होता. दोघांनी लग्नाची पूर्ण खरेदी अमेरिकेतून केली आहे.
लग्नापूर्वी दिली होती पार्टी
या विकेंडला दिनेश आणि दीपिकाने आपल्या मित्रांना पार्टी दिली होती. या पार्टीला 15 जवळचे मित्र उपस्थित होते. या पार्टीचा ड्रेस कोड पिंक ठेवण्यात आला होता. दीपिकाला हा रंग खुप आवडतो. या पार्टीत दीपिकाची ऑस्ट्रेलियन कोच साराह फिट्ज गेराल्ड याही आल्या होत्या.
कार्तिकचे दुसरे लग्न
हे कार्तिकचे दुसरे लग्न असणार आहे. त्याने पहिल्या पत्नीशी घटस्पोट घेतला आहे. 2007 मध्ये कार्तिकने त्याची लहाणपणची मैत्रिन निकिताबरोबर लग्न केले होते. कार्तिक आणि निकिताचे कुटुंबीय हे चांगले मित्र आहेत. सोबत खेळता-खेळत ते दोघे प्रेमात पडले आणि गोष्ट लग्नापर्यंत गेली, मात्र या लग्नाचा लवकरच शेवट झाला. 2012 मध्ये सहकारी क्रिकेटर मुरली विजयशी निकिताचे अफेअर असल्याने कार्तिकने तिला घटस्पोट दिला होता.
2013 मध्ये झाला होता दीपिकाशी साखरपुडा
कार्तिक आणि दिपिका यांची ओळख फेब्रुवारी 2013 मध्ये झाली होती. आणि याच वर्षी दोघांचा साखरपुडाही झाला. साखरपुड्यानंतरही या यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले नव्हते. मात्र, आयपीएल-8 च्या एका मॅच मध्ये दीपिका स्टेडिअमवर कार्तिकला चीअर करण्यासाठी आली होती.
ऑक्टोंबर 2014 मध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कार्तिक आणि दीपिका यांनी सांगितले होते की, ते 2015 मध्ये लग्न करू शकतात.
पुढील स्लाईडवर बघा, दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल यांच्या हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नाचे फोटो....