आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंबळे, द्रविड, जहीरचा अवमान करू नका‌! ट्विट करून बीसीसीआयवर रामचंद्र गुहा भडकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे माजी (सीओए) सदस्य आणि सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयवर जोरदार टीका केली. गुहा यांनी अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि जहीर खानच्या विषयावर बीसीसीआयला झोडपले. बीसीसीआय अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि जहीर खान यांना अवमानित करत आहे. या तिन्ही महान खेळाडूंचा अवमान करू नका, असे त्यांनी सांगितले.  

गुहा यांनी लिहिले की, ‘बीसीसीआयने अनिल कुंबळेचा अवमान केला आहे. आता राहुल द्रविड, जहीर खान यांना सुमार वागणूक दिली जात आहे.’ अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि जहीर खान क्रिकेटचे दिग्ग्ज खेळाडू होते. त्यांनी क्रिकेटच्या मैदानात आपले पूर्ण योगदान दिले आहे. सार्वजनिकरीत्या त्यांचा असा अवमान करणे योग्य नाही, असेही गुहा यांनी म्हटले. 
बातम्या आणखी आहेत...