आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीच्या ड्रीम टीममध्ये सचिन, द्रविड, कोहली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंेडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहलीची आपल्या ऑल टाइम इलेव्हनमध्ये निवड केली आहे. लॉर्ड््स क्रिकेट मैदानाच्या सहकार्याने व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमची निवड केली. ज्या खेळाडूंसोबत, विरुद्ध आपण खेळलो किंवा ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, अशा खेळाडूंची संघात निवड करायची होती. डॅनियल व्हिट्टोरीने विराट कोहलीला आपल्या ड्रीम टीमचा कर्णधार बनवले आहे, हे विशेष.  

आयपीएलमध्ये आरसीबीचा मुख्य कोच असलेल्या व्हिट्टोरीने ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंची दोन विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पॉटिंग, विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट, महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि फिरकीपटू शेन वॉर्नची संघात निवड केली आहे. न्यूझीलंडकडून महान अष्टपैलू खेळाडू सर रिचर्ड हॅडली यांचीच संघात निवड होऊ शकली. श्रीलंकेचा कुमार संगकारा, द. आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलर्स आणि मुथय्या मुरलीधरन यांनी व्हिट्टोरीच्या संघाला पूर्ण केले. द. आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची १२ वा खेळाडू म्हणून निवड झाली.   

कोहलीला बनवले कर्णधार
विराट कोहलीला कर्णधार का बनवले, यावर व्हिट्टोरीने म्हटले की, “मी कोहलीला जवळून ओळखतो. त्याचा खेळाबद्दलचा दृष्टिकोन, उत्साह सर्वात वेगळा आहे, असे म्हणायला हरकत नाही. विराटमध्ये विजयाची भूक खूप जास्त आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला कर्णधार बनवताना मी आनंदी असेल.’ व्हिट्टोरीने ११३ कसोटींत ३५च्या सरासरीने ३६२ बळी घेतले. व्हिट्टोरी रंगना हेराथनंतर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने कसोटीत २० वेळा ५ पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. व्हिट्टोरीने मधल्या फळीचे दोन फलंदाज राहुल द्रविड आणि पॉटिंग यांना सलामीवीर म्हणून निवडले. 

व्हिट्टोरीची ड्रीम टीम   
रिकी पॉटिंग, राहुल द्रविड, विराट कोहली (कर्णधार), ए. बी. डिव्हिलर्स, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, रिचर्ड हॅडली, जॅक कॅलिस.  
बातम्या आणखी आहेत...