आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dwayne Johnson And Girlfriend Lauren Hashian \'are Expecting A Baby Together\'

दुसर्‍यांदा होणार द रॉक \'डॅड\' , मॉडेल गर्लफ्रेंड लॉरेन हॅशन आहे प्रेग्नंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका इव्हेंटमध्ये भाग घेताना ड्वेन जॉन्सन आणि लॉरेन हॅशन. - Divya Marathi
एका इव्हेंटमध्ये भाग घेताना ड्वेन जॉन्सन आणि लॉरेन हॅशन.
मियामी- ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉकच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रॉक दुसर्‍यांदा पिता होणार आहे. रडारऑनलाइन डॉट कॉमनुसार रॉकची मॉडेल गर्लफ्रेंड लॉरेन हॅशन प्रेग्नंट आहे. हा लॉरेनचा पहिला मुलगा असेल तर द रॉकचा दुसरा. न्यूज साइटच्या मते, रेसलर आणि हॉलीवुड अॅक्टरच्या फार जवळच्या व्यक्तीने या वृत्ताची पुष्टीही केली आहे. द रॉकला एक्स वाइफ डॅनी ग्रासियापासूनची एक 14 वर्षाची मुलगीही आहे. तिचे नाव सिमोना आहे. 2008 मध्ये डॅनीबरोबर ड्वेन जॉन्सनचा वाद झाला होता.

2007 पासून आहेत सोबत
ड्वेन जॉन्सन आणि लॉरेन हॅशन यांच्यात 2007 पासून अफेअर आहे. या कपलच्या प्रेमकरणाला कंटाळूनच डॅनीने जॉन्सनपासून जून, 2007 मध्येच डिव्हर्स घेतला. त्यानंतर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. बातम्यांच्या अनुसार लॉरेन आणि जॉन्सनची मुलगी सिमोना यांचे चांगले जुळते. हेच कारण आहे की, जॉन्सन कधीच लॉरेनपासून वेगळा होऊ शकला नाही.
1997 मध्ये केले होते लग्न
जॉन्सन आणि डॅनी यांचे लग्न 1997 मध्ये झाले होते. हे दोघे एकमेकांना कॉलेजपासून ओळखत. द स्कॉर्पियन किंग, फास्ट अँड फ्यूरिअस सीरीजसारख्या अनेक ब्लॉक बस्टर हॉलीवुड सिनेमांमध्ये अॅक्टिंगचा करिश्मा दाखवलेला द रॉक WWE च्या धोकादायक रेसलर्समध्ये गणला जातो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ड्वेन जॉन्सनची गर्लफ्रेंड लॉरेन, एक्स वाइफ डॅनी आणि मुलगी सिमोनाचे फोटो...