आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिमला हरवून पूर्व विभाग चॅम्पियन, सय्यद मुश्ताक अली टी-20 आंतरविभागीय ट्रॉफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विराट सिंग (५८) आणि ईशांक जग्गीच्या (५६) अर्धशतकाच्या बळावर पूर्व विभागाने शानदार कामगिरी करताना सय्यद मुश्ताक अली आंतरविभागीय टी-२० स्पर्धेच्या फायनलमध्ये पश्चिम विभागाला ८ विकेटने हरवत विजेतेपद  पटकवले.
 
पश्चिम विभागाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १४९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पूर्व विभागाने शानदार कामगिरी करताना १३.४ षटकांत २ बाद १५३ धावा काढून सहज सामना जिंकला.  
 
पूर्व विभागाकडून सलामीवीर विराट सिंगने ३४ चेंडंूत ३ षटकार, ५ चौकार मारताना नाबाद ५८ धावा काढल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशांक जग्गीने अवघ्या ३० चेंडंूत ६ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ५६ धावा काढून विजय निश्चित केला. मनोज तिवारीने नाबाद ९ धावा काढल्या. सलामीवीर अरुण कार्तिकने १४ चेंडूंत २ षटकार, २ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. पूर्वच्या दोन्ही विकेट शार्दूल ठाकूरने घेतल्या.  
 
तत्पूर्वी, शेल्डन जॅक्सनच्या अर्धशतकामुळे पश्चिमने १४९ धावा काढल्या. शेल्डन जॅक्सनने ४४ चेंडूंत २ षटकार आणि ५ चौकारांसह ५२ धावा काढल्या. त्याच्याशिवाय पश्चिमकडून रुजूल भट्टने नाबाद ३६ तर मंकडने २० धावांचे योगदान दिले. इतरांनी निराशा केली. पार्थिव पटेलने १७ तर आदित्य तारेने १ धाव काढली. गोलंदाजीत पी. दासने २ तर प्रधान, घोष, ओझा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 
 
बातम्या आणखी आहेत...