आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाैथ्या कसोटीला अाता नाेटाबंदीचाही फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ५०० ते १ हजार रुपयांच्या नोटाबंदीचा फटका भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला बसला. मुंबईतील ८ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीतही उदासीनता दिसून येत आहे. टी-२० व वनडेसाठीच तिकिटांची मागणी असताना कसोटीकडे फारसे प्रेक्षक सध्या आकृष्ट होत नाहीत. नोटाबंदीमुळे रोखीने तिकिटे घेणाऱ्यांची संख्याही यंदा रोडावेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन आपल्या संलग्न क्लबना रोखीने तिकिटे देत होती. मात्र, या वेळी सवलतीच्या दरातील तिकिटांसाठीची रक्कम चेकने अथवा सध्या प्रचलित असणाऱ्या नोटांनीच भरावी, असे क्लब्जना कळवण्यात आले आहे. नॉर्थस्टँडचे ५ दिवसांचे तिकीट क्लबसाठी ६०० रुपयांत, तर गावसकर स्टँडचे ३०० व ५०० रुपयांत देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...