आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने भारतावर बहिष्कार टाकावा : मनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आयसीसीच्या स्पर्धांत भारतावर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीअाय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनी नाराज झाले आहेत. पीसीबीने आयसीसीच्या स्पर्धांत भारताविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे मनी म्हणाले. इतकेच नव्हे तर पुढच्या आठवड्यात केपटाऊन येथे होणाऱ्या आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीतही पीसीबीने हा विषय ठळकपणे मांडला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

भारताने सीमेवर तणावाच्या स्थितीत पाकिस्तान क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यातसुद्धा त्यांनी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याची शक्यता फेटाळून लावली. भारताने आयसीसीच्या स्पर्धांत आपल्याला पाकिस्तानसोबत एकाच गटात ठेवू नये, अशीही मागणी केली होती.

मनी यांचा जळफळाट
१. पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी आयसीसीला विचारले पाहिजे की, पाकिस्तानबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याचा अधिकार अनुराग ठाकूर यांना कोणी दिला.
२. अनुराग ठाकूर खासदार आणि राजकीय नेते आहेत. पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित विषयावर ते कसे काय बाेलू शकतात, हे आयसीसीने अनुराग ठाकूर यांना विचारले पाहिजे.
३. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याने आयसीसीची खूप कमाई होते. याचा मोठा भाग बीसीसीआयला मिळतो. यानंतरही भारताला पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास काय अडचण आहे?
४. पाकिस्तानबाबत बीसीसीआयची भूमिका अत्यंत नकारात्मक आहे. अशा स्थितीत पाकने आयसीसीसमोर आपली मजबूत बाजू मांडली पाहिजे. पाकने आपले मत मांडले पाहिजे.
५. २००७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका न झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे जवळपास १० कोटी डॉलरपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. पाक क्रिकेट मंडळाला दिवाळखोर करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न आहेत.
बातम्या आणखी आहेत...