आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: \'अहंकारी कोहलीला मी वठणीवर आणू शकतो\', नाशिकच्या इंजिनिअरने केला कोचसाठी अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे एक क्रिकेटप्रेमी मेकॅनिकल इंजिनिअर चांगलाच नाराज झाला आहे. वादानंतर अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. ही घटना या अभियंत्याला आवडली नाही. त्याच्या नजरेत या प्रकरणात कर्णधार विराट कोहली या प्रकरणात चुकीचा आहे. 
 
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या उपेंद्रनाथ ब्रह्मचारीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. टीम इंडियाचा कोच बनण्यामागे त्याचे लक्ष्य आहे “अभिमानी कोहलीला योग्य ट्रॅकवर आणणे’. एका बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय उपेंद्रने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संकेतस्थळावर दिलेल्या ई-मेलवर कोच बनण्यासाठी अर्ज केला आहे. लाखो क्रिकेट चाहत्यांप्रमाणे उपेंद्रलासुद्धा कुंबळेच्या राजीनाम्यामागे कोहली दोषी असल्याचे वाटते.  उपेंद्र प. बंगालच्या बर्दवानचा राहणारा असून, महाराष्ट्राच्या नाशिक येथे एका कंपनीत तो काम करतो. 
 
कोच पदासाठी केलेल्या अर्जात उपेंद्रने म्हटले की, ‘दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर मी टीम इंडियाचा मुख्य कोच बनण्यासाठी अर्ज करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला कोच म्हणून एखाद्या माजी खेळाडूची गरज नाही, असे मला वाटते. क्रिकेटच्या सल्लागार समितीने (सीएसी) पुन्हा एखाद्या माजी क्रिकेटपटूला कोच बनवले तर कोहली त्याचासुद्धा अवमान करेल,’ असेही उपेंद्रने लिहिले. 
 
मी अभिमानी व्यक्तीच्या वागणुकीला सहन करू शकतो. अनेक मोठमोठ्यांना असे करता येत नाही. याशिवाय कोहलीला योग्य वळणावरसुद्धा मी आणू शकतो, असे उपेंद्रने सांगितले. उपेंद्रच्या अर्जामुळे सोशल मिडियावर खमंग चर्चा रंगली आहे.

हर्ष गोयंका यांनी सांगितली कोचची  ‘पात्रता'  
आयपीएलमधील पुणे सुपरजायंट्स संघाचे सहमालक हर्ष गोयंका यांनीसुद्धा कोहली-कुंबळे वादावर टीका केली आहे. गोयंका यांनी भारतीय संघाचा कोच बनण्यासाठीची ‘पात्रता’ सांगितली. हर्ष गोयंका यांनी िट्वट केले की, ‘भारतीय क्रिकेट संघाच्या कोच पदासाठी अर्ज पाठवा. पात्रता : प्रवासाचा कार्यक्रम तयार करणे, हॉटेलच्या खोल्या बुक करणे, बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट कर्णधाराबद्दल अाज्ञाधारक असणे.’ कुंबळेच्या कामाच्या पद्धतीवर कोहलीने असमाधान व्यक्त केले होते. यानंतर कुंबळेने पदाचा राजीनामा दिला.   
 
हेही वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...