आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्‍लंडचा कूक याचे शेतक-याच्‍या मुलीसोबत लग्‍न, ट्रॅक्‍टरवर बसून नवरी आली होती सासरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅशेज मालिकेतील यशामुळे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक आणि पूर्ण टीम सध्‍या एका सेलिब्रेशनच्‍या मूडमध्‍ये आहे. मैदानाबाहेरही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करणारा माणूस म्‍हणून कूकची ओळख आहे. त्‍याने लग्‍नातूनही आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. तेव्‍हाची त्‍याच्‍या चाहत्‍यांचा जल्‍लोष दिसून आला होता.
ट्रॅक्टरवर बसून नवरी आली सासरी
कूकने 31 डिसेंबर 2011 मध्‍ये त्‍याची गर्लफ्रेंड एलिससोबत लग्‍न केले होते. नवीन वर्षाच्‍या पूर्वसंध्‍येला झालेला हा लग्नसोहळा फारच आकर्षणाचा विषय ठरला होता. चर्चमधून बाहेर आल्‍यानंतर कूकने चक्‍क ट्रॅक्‍टरवर बसवून पत्‍नीला घरी आणले होते. त्‍याचे रिसेप्‍शन एका फार्म हाऊसमध्‍ये होणार होते म्‍हणून कुकने असे केले होते. त्‍याने स्‍वत: ट्रक्‍टर चालवले होते. एलिस ही एका शेतकरी कुटूंबातील मुलगी आहे. कुकच्‍या लग्‍नसोहळ्याचा थाट म्‍हणजे उपस्‍थितांचे आकर्षण होते. इंग्‍लंडचे कित्‍येक क्रिकेटर या लग्‍नसोहळयात सहभागी झाले होते.
वर्गमैत्रीण झाली पत्‍नी
एलिस आणि कूकची भेट शालेय जीवनात झाली होती. शाळेत कूकने एक म्‍यूझिक स्‍कॉलरशिप जिंकली होती. त्‍यावेळी त्‍याची आणि एलिसची ओळख झाली. ती जवळच्‍याच एका शाळेत शिकत होती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, अॅलिस्टर कूकचे त्‍याच्‍या पत्‍नीसोबतचे काही खास फोटो..